
गोजोरे, Gojore ता.भुसावळ । वार्ताहर
येथील रहिवास तथा सेवानिवृत्त सैनिक (Retired soldier) पांडूरंग पाटील हे जामनेर येथील दुकान बंद करून घराकडे निघाले. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने शोधा शोध केली असता त्यांचा मृतदेह महादेवमाळ फाट्याजवळ झाडाझुडपांमध्ये आढळून आला. पांडूरंग पाटील याचा अपघात झाला का कोणी घात (hit or accident) केला. तसेच पैशांची बॅग न सापडल्याने घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, येथील सेवानिवृत्त माजी सैनिक पांडुरंग वना पाटील ( वय 52) हे गेल्या पाच वर्षांपूर्वी सीआरपीएफ मधून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी नंतर जामनेर येथे बी.ओ.टी कॉम्प्लेक्समध्ये गणेश साडीया नावाचे दुकान सुरू केले होते. ते दररोज दुकानात गोजोरे ते जामनेर प्रवास करत असत. दि. 9 फेब्रुवारी रोजी ते दुकानातून संध्याकाळी घरी परत यायला निघाले असता घरी यायला उशीर झाला, त्यामुळे घरची मंडळी चिंतातूर झाली, फोन लावून बघितला असता फोन लागत नव्हता, तेव्हा घरच्यांना थोडी शंका आल्याने त्यांनी जामनेर येथे शोधार्थ जायचे ठरविले.
त्यांनी शोधाशोध केली असता पांडुरंग मिळून न आल्याने त्यांची शंका अधिक बळकावली त्यावेळी त्यांनी त्यांची रस्त्याच्या मार्गाने शोधा शोध केली असता ते महादेव माळ फाट्याजवळ रस्त्याच्या लगत झाडाझुडपांमध्ये पडून असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांची हिरो होंडा कंपनीची सीबीझेड मोटरसायकल एमएच 19 बीसी 2074 ही सुद्धा तेथे आढळून आली.
गाडीला काही झाले नसून पांडुरंग जागीच गतप्राण झाल्याचे निदर्शनास आले. प्रत्यय दर्शनी मयत पांडुरंग यांच्या चेहर्यावरील जखमा पाहून हा अपघात नसून घात झाल्याचा प्रकार असल्याचा निष्कर्ष काढला. कारण गाडीला काही झाले नव्हते तसेच त्यांच्याजवळ असलेली पैशांची बॅग न सापडल्याने आणि पांडुरंग पाटील हे जागीच गतप्राण झाले असल्याने हा शंभर टक्के लुटमारचा प्रकार असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली.
त्यांचा मृतदेह भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये आणला असता ट्रामा सेंटरचे वैद्यकीय अधिकारी यांनी दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी मृताचे शवविच्छेदन करून मृतदेह घरच्यांच्या ताब्यात दिला. त्यांच्यावर गोजोरे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात दुपारी 4 वाजता येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.
यावेळी गावातील सीमेवरती तैनात असलेले जवान सुट्टीवर आले असल्याने त्यांनी आपल्या गणवेशामध्ये मयत पांडुरंग पाटील यांच्या प्रेतयात्रेला खांदा दिला. या जवानाने गणवेशातच पाटील यांना मानवंदना दिली. यावेळी गावातील सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.