एफ.वाय.बी.एस्सी इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाची पुनर्रचना वाढवेल विद्यार्थ्यांचा बौध्दिक विकास

नूतन मराठा महाविद्यालयात अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा
एफ.वाय.बी.एस्सी इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाची पुनर्रचना वाढवेल विद्यार्थ्यांचा बौध्दिक विकास

जळगाव jalgaon

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) आणि नूतन मराठा महाविद्यालय (Nutan Maratha College) जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एफ वाय बी एस्सी इलेक्ट्रॉनिक (FY BSc Electronic) या विषयाच्या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा (Curriculum Reconstruction Workshop) घेण्यात आली.

उद्घाटन (Inauguration) अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी. एस. पाटील कबचौ उमवि, नूतन मराठा महाविद्यालय वरणगाव चे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. के. सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी अभ्यास मंडळ सदस्य प्राचार्य आर. बी. वाघूळदे, प्राचार्य. बी. के. सोनवणे, प्रा. डॉ. वाय.के.चौधरी, प्रा.डाॅ. ए.एल. चौधरी व डॉ.के.डी.गायकवाड उपस्थित होते. उपप्राचार्य तथा कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एस. ए. गायकवाड यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे (Workshop) दिपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.

कार्यशाळेचे आयोजना मागील भुमिका कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एस. ए. गायकवाड यांनी प्रास्ताविकात नमुद केली

आपल्या मनोगतात प्रा. डी. एस. पाटील यांनी एफ. वाय. च्या विद्यार्थ्यांना पेलवेल, पचेल आणि विद्यार्थ्यांचा (students) बौद्धिक विकास (Intellectual development) वाढेल असा अभ्यासक्रम निवडण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. बी. के. सोनवणे यांनी अभ्यासक्रमावर (syllabus) साधक बाधक चर्चा घडवून अभ्यासक्रम निवडण्यासाठी आवाहन केले.

विविध महाविद्यालयातून आलेल्या मान्यवर प्राध्यापकांनी अभ्यासक्रमासंदर्भात विस्तृतपणे चर्चा करून आपली मते नोंदविली. दरम्यान सामुहिक चर्चा घडवून आणत सर्वानूमते अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला.

कार्यशाळा यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख प्रा. नितीन बाविस्कर,प्रा. के. बी. पाटील,प्रा. आदित्य पाटील, कु पीनल सोनार आणि कु योगेश्वरी पाटील यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com