भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेत संशोधकांनी उपक्रमशीलता आणावी - लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेत संशोधकांनी उपक्रमशीलता आणावी - लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

फैजपूर (Faizpur) ( प्रतिनिधी ) -

प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती (higher education) अवघ्या विश्वाला आदर्शवत व अनुकरणीय असताना सद्यस्थितीत गुणवत्तेच्या बाबतीत भारतीय शिक्षण पद्धतीत नव्या संशोधकांनी (Researchers) उपक्रमशीलता, नाविन्यपूर्णता आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्ज़ेदार शिक्षण (Quality teaching) पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन लेफ्ट.(Lieutenant) डॉ. राजेंद्र राजपूत (Dr. Rajendra Rajput) यांनी केले.

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या कै. दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधनी अंतर्गत आयोजित पाच दिवसीय टारगेट पीएच. डी. प्रवेश पात्रता परीक्षेच्या कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी कार्यशाळेचे समन्वयक तथा मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. जाधव, सहसमन्वयक प्रा. दीपक पाटील व जळगाव, धुळे नंदुरबार येथील सुमारे 45 संशोधक उपस्थित होते.

17 जानेवारी ते 21 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित पाच दिवसीय ऑनलाइन पीएच.डी. एंट्रन्स टेस्ट वर्कशॉप मध्ये संशोधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. यात रिसर्च इन्स्टिट्यूट - डॉ. सीमा बारी, टीचींग एटीट्यूट- प्रा. अश्विनी जाधव, लॉजिकल रिझनिंग - प्रा. शेरसिंग पाडवी, इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी - प्रा. शुभांगी पाटील, मॅथेमॅटिकल रीझनिंग - डॉ. सागर धनगर, जनरल अवेअरनेस ऑफ हायर एज्युकेशन सिस्टीम - डॉ. राजेंद्र राजपूत आदींनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि दृक श्राव्य सादरीकरण केले आहे.

उद्याच्या शेवटच्या सत्रात ईनव्हरमेंटल अवेअरनेस या विषयावर प्रा शिवाजी मगर व पेट पात्रता व नियम अटी या संदर्भात डॉ एस व्ही जाधव मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एस. व्ही. जाधव यांनी पाच दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेत घेतले गेलेले सर्व विषयांवर पीपीटी सादरीकरण व अभ्यासासाठी आवश्यक माहिती पुरवण्याचे तथा भविष्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव परिक्षेत्रातील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांसाठी अशाप्रकारे नव उपक्रम राबवले जातील असा मनोदय व्यक्त केला.

कार्यशाळेच्या आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष आ. शिरीष मधुकरराव चौधरी, प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनीचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com