प्रजासत्ताकमुळेच देश महासत्ता - ॲड. अर्जुन पाटील

प्रजासत्ताकमुळेच देश महासत्ता - ॲड. अर्जुन पाटील

बोदवड /प्रतिनिधी /Bodwad -  

येथिल  दिवाणी व फौजदारी न्यायालयात सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात  प्रजासत्ताक दिवस व घटना निमिती या विषयावर ॲड. अर्जुन पाटील यांनी वरील विचार मांडले. 

घटनेच्या सरनामा हा घटनेचा आत्मा आहे. सरनाम्यातील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्षक, प्रजासत्ताक, गणराज्य या शब्दावरून असे दिसुन येते की, देशाची जनता ही सविधानाने दिलेल्या अधिकारानुसार सार्वभौम झालेली आहे. देशातील कोणत्याही नागरीकाचे जिवीत, वैयक्तीक, आर्थिक स्वातंत्र कोणीही हिरावुन घेवु शकत नाही. हे सर्व देश प्रजासत्ताक झाल्यामुळेच शक्य झाले आहे. 

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या.क्यु.ए.एन. सरवरी होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती - अर्जुन टी. पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकिल संघ, तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन ॲड. के.एस.इंगळे, यावेळी प्रजासत्ताक दिनांचे महत्त या विषयावर ॲड. धनराज सी. प्रजापती, ॲड. श्रृती सिखवाल यांनी आपले विचार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास ॲड.मिनल अग्रवाल, ॲड.व्हि.पी.शर्मा, ॲड.एन.एस.लढे, ॲड.विजय मंगळकर, ॲड.मुकेश पाटील, ॲड.तेजस्विनी काटकर,ॲड.आय.डी.पाटील, न्यायालयीन अधिक्षक एस.पी.आठवले नाना, प्रशांतकुमार बेदरकर, कार्यक्रम संमन्वयक शैलेश पडसे, सोनु थोरात, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, बिलिफ वर्ग, पक्षकार वर्ग, पो.कॉ. आर.डी.महाजन,  पो.कॉ.शशि शिंदे, पो.कॉ. संदिप वानखेडे हे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com