
जळगाव - Jalgaon
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय, सावखेडा येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन सोहळागुरुवार, दि.२६रोजी साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवगाव,जम्मू काश्मीर येथे २१वर्ष सैन्य दलात सेवा बजावलेले सुभेदार संदीपकुमार सिंग विवेकानंद प्रतिष्ठानचे सहसचिव आणि शालेय समितीचे अध्यक्ष विनोद पाटील, शासकीय अधिकारी दिनेश ठाकरे यांची उपस्थिती होती. यांच्या सोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश चौधरी, उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे, निवासी विभाग प्रमुखशशिकांत पाटील आणि विभाग प्रमुख सुर्यकांत पाटील, राजेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत शिक्षक वरुण नेवे आणि श्रीमती. रंजना बाभूळके यांनी उठ जाग भारत जागो आणि लहेराये लहेराये सबका प्यारा सबसे न्यारा हे जोशपूर्ण देशभक्तीपर स्फुर्तीगीत सामुहिकरित्या सादर केले. कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय रवींद्र पाटील यांनी केला. सूत्रसंचालन, विद्यालयाचे डे स्कॉलर इयत्ता पाचवीचे विद्यार्थी कु.मानवी मोहकर, चि.ज्ञानेश्वर जाधव यांनी केले. यानंतर मान्यवरांचे हस्ते भारतमाता प्रतिमापूजन व ध्वजपूजन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर विद्यालयाच्या एन.सी.सी.पथक आणि तालुका, जिल्हा विभाग व राज्य स्तरावर विजेते खेळाडू तसेच घोष पथक यांनी शिस्तबद्ध व तालबद्ध पथसंचलन करून तिरंग्याला मानवंदना दिली. या प्रसंगी झालेल्या रंगारंग कार्यक्रमात क्षितीज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या विद्यार्थींनीनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. अजय काशीद यांनी आभार मानले.
यशस्वीतेसाठी कार्यक्रमप्रमुख अनिल वैद्य, अजय काशीद यांच्यासह विद्यालयातील क्रीडाशिक्षक व शालेय परिवारातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका आणि शालेय परिवारातील सर्व शिक्षकेतर सदस्य, निवासी विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सदस्य श्रवण विकास कर्णबधीर विद्यालयातील शिक्षक, आश्रय माझे घर या विद्यालयाचे शिक्षक आणि मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व आजी – आजोबा यांची उपस्थिती होती. यानंतर सर्वांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.