
अरुण होले
फैजपूर Faizpur
जेथे संत (Saint) एकत्र येतात तेथे तीर्थ क्षेत्र (Pilgrimage area) असते म्हणून वढोदा हे आज तीर्थक्षेत्र झाले आहे सद्गुरूंची (Sadhguru's) सेवा जनार्दन महाराजांनी केली व त्या प्रित्यर्थ निष्कलंक धाम (Immaculate Dham) येथे तुलसी हेल्थ केअर सेंटर (Tulsi Health Care Centre) आणि जगन्नाथ गौशाला (Jagannath Gaushala) काढून आपल्या गुरूला नमन केले त्यांनी निष्काम भावनेने जी सेवा केलेली आहे. त्यांची तुलना होऊ शकत नाही असे उद्गार आपल्या अध्यक्षीय पदावरून बोलताना परमपूज्य अनंत श्री विभूषित जगद्गुरु सतपंथाचार्य श्री ज्ञानदेव सिंहजी महाराज तीर्थ धाम प्रेरणा पीठ गुजरात यांनी सांगितले.
ते वढोदा येथे सुरू असलेल्या समरसता महा कुंभाचा दुसऱ्या दिवशी अध्यक्ष स्थानावरून धर्मसभेला संबोधित करीत होते. सर्व धर्माचार्य यांनी परस्परातील प्रेम आत्मीयता यावर जोर देत या ऐतिहासिक महाकुंभाला यशस्वी केले. विविध संप्रदायातील संत महंतांनी जे अमृत मंथन केले त्यामुळे हिंदू धर्माचा विकास निश्चितच होणार आहे दि. ३० डिसेंबर रोजी झालेल्या समरसता महा कुंभाचे अध्यक्ष पद परमपूज्य निर्मल पिठाधीश्वर श्री महंत ज्ञानदेव सिंहजी महाराज, निर्मल पंचायती आखाडा हरिद्वार हे होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध धर्माचाऱ्यांनी विविध पंथ धर्म याविषयी आपले विचार मांडले.
प.पु. पंकजदासजी महाराज यांनी धर्म हा माणसा माणसाला जोडण्याचे कार्य करतो यावर भर देत आपले विचार मांडले. प.पू. राजेंद्र दास जी महाराज यांनी आपल्या गुरुच्या प्रित्यर्थ जो ज्ञानयज्ञ उभारला त्याविषयी जनार्दन महाराजांचे कौतुक केले. ब्रह्मकुमार रामनाथ भाई यांनी हात आणि साथ हे दोन्ही एकत्र आले तर जे भव्य दिव्य घडते ते येथे घडत आहे असे सांगून स्नेह आणि संयोग याचे प्रत्यक्ष दर्शन या सभा मंडपात घडत आहे हे उपस्थित भाविकांच्या लक्षात आणून दिले. जनसेवा हे ध्येय बाळगून जनार्दन महाराज हे सेवा करीत आहे. त्यामुळे या भागाचा निश्चित विकास होईल हे आवर्जून सांगितले. प्रकाश आणि शक्ती यांचा अभूतपूर्व संयोग येथे घडत आहे. आचार्य अमृतसिंहजी महाराज यांनी आपल्या धर्मव्याख्यानातून जनतेत जनार्दन पाहणारा हा हरी आहे . या शब्दात जनार्दन महाराजांची स्तुती केली. महाकुंभाला सार्थक बनवण्याचे कार्य महाराजांनी केले आहे . हे त्यांनी उपस्थित जनतेस सांगितले.
परमपूज्य स्वामी जितेंद्र नंदाजी सरस्वती हे राष्ट्रीय महामंत्री असून त्यांनी पूर्व सुरींचे स्मरण करून त्यांच्यामुळेच आज मी घडलो आहे हे सांगितले. समरसता या शब्दाची फोड करून त्यांनी आत्मा परमात्मा गुरु आणि शिष्य यांचे विवेचन केले पाण्यात जशी साखर विरघळते आणि पाणी रसदार बनते त्याप्रमाणे सर्व धर्माचाऱ्यांच्या अमृत मंथनाने आज येथे समरसता निर्माण झाली आहे. धर्माच्या विकासामुळे आर्थिक विकास कसा होतो. हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन सांगितले. अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी तीर्थक्षेत्रांचाही विकास झाला पाहिजे हे ही त्यांनी स्पष्ट केले.
महानुभाव पंथाचे प्रतिनिधित्व करणारे सावदा येथील प.पु.श्री मानेकर बाबा यांनी जनार्दन महाराजांनी समरसतेची जी संकल्पना मांडली त्याचे कौतुक करून जातीयता ही हिंदू संस्कृतीला लागलेली कीड आहे असे सांगितले. हिंदु धर्म आज संप्रदायाच्या वादामुळे व्यथीत झाला आहे. असे सांगितले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी आपण सर्व ईश्वराची लेकरे आहोत हे तत्कालीन हिंदूंना ठणकावून सांगितले. भारताच्या इतर भागात पंथा पंथात समरसता नसली तरी आमच्या भागात मात्र पंथांची समरसता आहे हे आजच्या व्यासपीठाने सिद्ध केले आहे हे सांगितले. संपूर्ण जगासमोर समरसतेची ही संकल्पना आली तर विश्वगुरू होण्याची क्षमता हिंदू धर्म निश्चितच निभावेल हे स्पष्ट केले.
परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी बालकानंद गिरीजी महाराज,दिल्ली यांनी असंभव गोष्टीला संभव करतो तो ईश्वर आणि संभवाला जो संशयाच्या दृष्टीने पाहतो तो मानव अशी व्याख्या करून जनार्दन महाराजांनी असंभव गोष्टीला येथे संभव करून दाखवले म्हणून ते ईश्वराचेच रूप आहे असे सांगितले. आई आणि गुरु यांच्या आशीर्वादातून जनार्दन महाराजांनी सर्व संप्रदायांना जोडण्याचे महान कार्य येथे केलेले आहे. परमपूज्य महंत श्री मोरारीदास महाराज श्री संतराम मंदिर करमसद, गुजरात, यांनी आपल्या धर्मव्याख्यानातून जनार्दन महाराजांची त्यांचे गुरु जगन्नाथ महाराजांच्या प्रति असलेली श्रद्धा आणि येथील लोकांची संतांच्या प्रति असलेली आस्था अद्भुत आहे असे सांगून एक भारावलेले वातावरण या महाकुंभाने येथे निर्माण झाले आहे असे सांगितले . संपूर्ण भारताला जोडण्याचे कार्य महाकुंभ करणार आहे व याचे श्रेय त्यांनी जनार्दन महाराजांना दिले.
अनंत देवगिरी जी महाराज यांनी समरसता म्हणजेच मानवता म्हणजेच हिंदुत्व अशी हिंदुत्वाची व्याख्या करून घटनेतील अनुच्छेद ३० यावर विवेचन केले ,आणि समान नागरी कायद्याची आवश्यकता प्रतिपादन केली. प.पु. रवींद्र कुटीजी महाराजांनी भारतातील संतांच्या परंपरेचा गौरव करून साऱ्या लोकात परमेश्वराचा एकच अंश आहे हे प्रतिपादन केले. धर्म क्षेत्रावर राजक्षेत्राचा व राजक्षेत्रावर धर्म क्षेत्राचा अंकुश असला पाहिजे हे सांगितले. जातीसंप्रदायाला मूठमाती देण्याचे महान कार्य जनार्दन हरीजी महाराज यांनी केले असे सांगून जाती व पंथ व्यवस्थेमुळे भारताला हजारो वर्ष मागे नेले आहे असे सांगितले. म्हणूनच या अमृत मंथनातून हिंदू धर्मातील विविध पंथ भेदांना नष्ट करण्याचे आव्हान त्यांनी केले. संतवाणी आशीर्वचन प्रसंगी सूत्रसंचालन महामंडलेश्वर मोहनदासजी राधे राधे बाबा इंदौर राष्ट्रीय संयुक्त महामंत्री यांनी केले.
व्यासपीठावर प.पु. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वतीजी महाराज, प.पु. ज्ञानदेव सिंहजी महाराज.प.पु. ज्ञानेश्वर दास जी महाराज अविचल दासजी महाराज. प.पु.स्वामी धर्मदेवजी महाराज. प.पु.विजयकुमार स्वामीजी महाराज. प.पु.महर्षि अंजणेशानंद सरस्वती महाराज.प.पु.संत यज्ञाचार्य शांती भगतजी महाराज, प.पु. स्वामी चैतन्य रामजी गिरी महाराज, प.पु.श्री भगवानाचार्य महाराज, प.पु.श्री.दिव्यानंदजी महाराज, प.पु.श्री.चंदू बाबा महाराज, प.पु.धर्मदेवजी महाराज,प.पु.आचार्य देवमुरारी बाबा, प.पु.पुरुषोत्तम दासजी महाराज,प.पु.ह.भ.प.धनराज महाराज, प.पु.श्री.गोपाल चैतन्यजी महाराज,प.पु.श्रीसंत राजेंद्र दासजी, प.पु.कन्हैया दासजी महाराज, प.पु.डिगंबर महाराज, प.पु.पंडित योगेश चतुर्वेदी,प.पु.श्री.मनमोहन दासजी राधे राधे बाबा , प.पु.केशवदासजी महाराज, प.पु.जगदिशदासजी महाराज, प.पु. रामकृष्ण जी महाराज, प.पु. महंत हरिओमदासजी महाराज, प.पु.महंत भक्तीचरण दासजी महाराज,प.पु.शास्त्री भक्तीकिशोर दासजी, प.पु.स्वामिनिर्माण नंदजी महाराज, प.पु.शास्त्री मानेकर बाबा, प.पु.भक्तीस्वरूपदासजी महाराज, प.पु.स्वरूपानंदजी महाराज, प.पु.महंत विशालदासजी महाराज, प.पु.महंत लोकनाथजी महाराज, प.पु.गौरी शंकरदासजी महाराज, प.पु.ईश्वर दासजी महाराज, प.पु.महेंद्र रविंद्र गुरुजी, प.पु.जितेंद्रानंद सरस्वती, प.पु.पवनदासजी महाराज, प.पु.मोहनदासजी महाराज, प.पु.मुरारीदासजी महाराज, प.पु.स्वामी हंसानंद तीर्थ, प.पु.बिरारीदासजी महाराज, प.पु.श्री. महंत रामकिशोर दासजी महाराज,प.पु. ह.भ.प.प्रवीण महाराज उपस्थित होते. या समरसता महाकुंभासाठी महाराष्ट्र, गुजराथ, मध्यप्रदेश आदी भागातील हजारो संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
त्यांच्या भोजनाची व निवासाची चोख व्यवस्था हजारो स्वयंसेवक करीत आहेत.
कार्यक्रमास सुमारे एक लाखाच्या आसपास भाविक भक्तगणांची उपस्थिती होती संपूर्ण सभा मंडप भक्तांच्या उपस्थितीने ओसंडून वाहत होता. या आशीर्वाचनात राज्य योगिनी ब्रह्मकुमारी मंगला दीदी क्षेत्रीय संचालिका बऱ्हाणपूर यांनी अनंत विभूषित श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती जी महाराज प्रयागराज यांना ईश्वरीय प्रतिमा भेट दिली.