Video बोरी नदीचे वाया जाणारे पाणी डाव्या कालव्याव्दारे सोडा - आ.चिमणराव पाटील

तामसवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग
Video बोरी नदीचे वाया जाणारे पाणी डाव्या कालव्याव्दारे सोडा - आ.चिमणराव पाटील

पारोळा - योगेश पाटील Parola

तालुक्यातील तामसवाडी (Tamaswadi) येथील बोरी धरणाचा (Bori Dam) पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरलेले असुन धरणाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Video बोरी नदीचे वाया जाणारे पाणी डाव्या कालव्याव्दारे सोडा - आ.चिमणराव पाटील
बोरी धरणाचा एक दरवाजा उघडला

याअनुषंगाने नदी विसर्गातुन वाया जाणारे पाणी बोरी डाव्या कालव्यातुन तालुक्यातील टोळी, तरडी, करंजी, शेवगे, मुंदाणे, हिवरखेडा, हिवरखेडा तांडा या गावांसाठी सोडण्यात यावे अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी आमदार चिमणराव पाटील यांचेकडे केली.

बोरी डाव्या कालव्याव्दारे पाणी सोडल्यास उपरोक्त गावांचा सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने बोरी डाव्या कालव्याव्दारे मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून असणारे क्षेत्र टँकरमुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सदरील मागणीची त्वरीत दखल घेवून (MLA Chimanrao Patil) आमदार चिमणराव पाटील यांनी गिरणा पाटबंधारे जळगांव विभागाचे कार्यकारी अभियंता डि.बी.बेहेरे यांच्याशी दुरध्वनीव्दारे संपर्क साधुन बोरी डाव्या कालव्याव्दारे पाणी सोडण्यात यावे अश्या सुचना केल्या. या सुचनेची डी.बी.बेहेरे यांनी दखल घेत पाणी लवकरच सोडण्याचे आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) यांना आश्वासन दिले.

Video बोरी नदीचे वाया जाणारे पाणी डाव्या कालव्याव्दारे सोडा - आ.चिमणराव पाटील
भीती कोरोनाची ; विद्यार्थ्यांचे शालेय भवितव्य टांगणीला
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com