जळगाव
Video गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन
1000 क्युसेस पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यासह तीन जिल्ह्यांना पाणी पुरवाठ करणार्या गिरणा धरणातून (girna dam) आज दि.१६-१२-२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता रब्बी हंगाम सन २०२२-२३ साठी गिरणा प्रकल्पातून सिंचनाकरिता पहिले आवर्तन सोडण्यात आले. गिरणाधरणातून १००० क्युसेस पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यामुळे सर्व नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.