Video # जिल्हा परिषदेच्या ७७ गटांची आरक्षण सोडत जाहीर

 Video # जिल्हा परिषदेच्या ७७ गटांची आरक्षण सोडत जाहीर

जळगाव- Jalgaon

बहुप्रतिक्षेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या ७७ गटांची आरक्षण सोडत गुरूवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. या सोडतीत प्रस्थापितांना धक्के बसले असल्याचे मानले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ७७ गटांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात अनु. जाती एकुण जागा ७ - ४ महिला, अनु. जमाती १५- ८ महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग १६ - ८ महिला, सर्वसाधारण ३९ - १९ महिला असे आरक्षण निश्‍चीत करण्यात आले आहे.

या प्रक्रियेवेळी महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे ह्या उपस्थित होत्या. तसेच ग्रामीण भागातील उमेदवार आणि त्यांचे समर्थकांनीही सोडतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com