धक्कादायक : लग्नाला नकार : मुलीच्या बापावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याचा प्रयत्न

मलकापूरच्या तीन तरुणांचा फिल्मी स्टाइल राडा
Breaking news
Breaking news Breaking news

पाचोरा Pachora प्रतिनीधी

मुलीला मागणी घातल्या (After demanding the girl) नंतर नकार (denial) देऊन दुसरीकडे लग्न (Marriage on the other hand) लाऊन देणार्‍या बापाचा (father's) मनात राग धरून (Anger in mind) मलकापुर (Malkapur) येथील तरूणाने (young man) दोन साथिदारांसह (two companions) पाचोरा (Pachora) येथे मुलीच्या बापाच्या (girl's father) डोक्याला पिस्तुल (pistol to the head) लावत घरात फिल्मी स्टाईल राडा (Filmy Style Rada) केला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून घटने नंतर तिन्ही संशयित फरार झाले आहे.

पाचोरा पोलिसात अरूण शिवाजी पाटील यांनी फिर्याद दिली आहे की, ते त्यांच्या पत्नीसह

गिरड रोडवर गणपती नगर येथे राहतात. त्यांच्या मोठ्या भावाची मुलगी मलकापुर येथे राहते. मुलगी योगीता हीचा विवाह होणे पुर्वी तीला पुतणी राणी हीचा दिर रोहीत राजु सोनवणे याने लग्ना करिता मागणी घातली होती . परंतु आम्हास व मुलगी योगीता हीस सदरचे स्थळ पसंत नसल्याने आम्ही त्यांना नकार दिला होता.

त्यावेळी रोहीत राजु सोनवणे याने त्यावेळी देखील आमचे घरी शिवीगाळ करुन वाद घातला होता. दि.३ सप्टेंबर रोजी सकाळी आमचेकडे गौरीची स्थापना झालेने आमचे घरी मुलगी योगीता ही सकाळी १० वाजता आली होती. त्यानंतर ती आमचे कडेच थांबली.रात्री सुमारे ११ वाजता मी तसेच पत्नी मंगलबाई मुलगी योगीता घरात असताना अचानक रोहीत राजु सोनवणे हा आमचा घरात हातात पिस्तोल घेवुन आला. त्या वेळी लागलीच पत्नी मंगलबाई हीने त्यास ओळखुन तु आमचे घरी का आला अशी विचारणा केली.

त्यास घराचे दारातुन बाहेर ढकलत असतांना त्याने त्याचा हातातील पिस्तोल माझे कपाळास लावले. मी घाबरुन त्याला घराबाहेर जोरात ढकलुन मोठमोठ्यानी आरडाओरड केल्याने घरासमोर अंगणात फिरत असलेला माझा भाचा गोकुळ सुभाष चव्हाण मदतीला धावून आला व त्याने सुध्दा रोहीत सोनवणे याला धरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी रोहीत राजु सोनवणे सोबत आलेले व अंधारात लपलेले दोन जणांनी येऊन भाचा गोकुळ यास पाठीवर छातीवर मारहाण व धारदार शस्त्राने वर करून जखमी केले.

त्यावेळी भाचा गोकुळ हा खाली पडला व त्याचे छातीतुन रक्त निघत होते. आवाज ऐकून भवानी नगर चे रहिवासी जमा झाले. आरोपींनी गर्दी पाहून मोटार सायकल क्र एम.एच.४७ व्ही. ८४५० वर बसुन पळ काढला. संशयित आरोपी रोहीत राजु सोनवणे याने घरात अनधिकृत प्रवेश आणि हातात पिस्तोल घेऊन व अन्य दोन अज्ञात आरोपीच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

पाचोरा पोलिसांत या प्रकरणी भाग ०५ गुरन ४०६ भादवी ३०७,४५२ ,३४ व शस्ञ अधिनियम १९४९ कलम ३ व २५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com