
जळगाव- jalgaon
थकबाकी मिळकतधारकांना (arrears property owners) महानगरपालिकेने (Municipalities) अभय योजना (Abhay Yojana) लागू केली आहे. या योजनेव्दारे आतापर्यंत ६ कोटी ७५ लाखांची वसुली झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या योजनेला प्रतिसाद मिळत असून, मंगळवारी थकबाकी धारकांनी १ कोटी ५७ लाखांचा भरणा Payment केला आहे.
मालमत्ताकराची थकबाकी भरल्यास त्या मालमत्ताधारकांना ९० टक्के शास्ती माफ करण्यात येणार आहे. तसेच दि.२२ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२२ दरम्यान थकबाकीचा भरणा केल्यास ७५ टक्के शास्ती माफ केली जाणार असून दि.६ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान, थकबाकी भरल्यास ५० टक्के शास्ती माफ केली जाणार आहे.
अभय योजनेचा सात ते आठ हजार नागरिकांना लाभ मिळाला असून ६ कोटी ७५ लाख ६८ हजार १६७ रुपये इतका भरणा झाला आहे. प्रभाग समिती क्रमांक १ मध्ये १ कोटी ७९ लाख ५५ हजार ०४२ रुपये इतकी वसुली झाली असून प्रभाग समिती क्रमांक २ मध्ये १ कोटी ८४ लाख ९४ हजार २१६ रुपये तर, प्रभागा समिती क्रमांक ३ मधून १ कोटी ८३ लाख २२ हजार ३४० रुपयांची व प्रभाग समिती क्रमांक ४ मधून १ कोटी २७ लाख ९६ हजार ५६९ रुपये इतकी वसुली झाली आहे.