महात्मा गांधी मार्केटमधील गाळेधारकांकडून २० लाखांची वसुली

मनपा प्रशासनाची थकबाकी वसूली मोहीम
महात्मा गांधी मार्केटमधील गाळेधारकांकडून २० लाखांची वसुली

जळगाव- jalgaon

महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) १८ व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत (Cheek term) २०१२ मध्ये संपुष्टात आली आहे. तेव्हापासून गाळेधारकांकडे थकबाकी (Arrears to the occupants) आहे. गुरुवारी उपायुक्त प्रशांत पाटील (Deputy Commissioner Prashant Patil) यांच्यासह पथक महात्मा गांधी मार्केटमध्ये (Mahatma Gandhi Market) जावून गाळेधारकांकडून वसुली केली. जवळपास १५ गाळेधारकांकडून २० लाखांची वसुली केल्याची माहिती कर अधीक्षक नरेंद्र चौधरी (Tax Superintendent Narendra Chaudhary) यांनी दिली.

महापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्‍न गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे. महापालिका प्रशासनाने गाळेधारकांना थकबाकी पोटी बिले बजावली आहेत. मात्र प्रशासनाने अवाजवी बिले बजावल्याचा आरोप गाळेधारकांकडून सातत्याने होवू लागला आहे. थकबाकी न भरल्यास गाळे सीलची कारवाई इशारा तीन महिन्यांपूर्वी दिला होता. प्रशासनाकडून सीलची कारवाई होत असल्याने मनपा गाळेधारक संघटनेच्या माध्यमातून आंदोलन देखील करण्यात आले होते.

त्यानंतर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. दरम्यान प्रशासनाकडून पुन्हा गाळे थकबाकी वसुलीची मोहीम सुरु करण्यात आली आहे. गुरुवारी उपायुक्त प्रशांत पाटील, करअधीक्षक नरेंद्र चौधरी, संजय दाभाडे, दशरथ बाविस्कर, बुडन खॉंन, तय्यब पटेल, मनोज पांडे, शिवा शिंदे, शंकर बागल, अय्युब खान, ईश्‍वर ठाकूर यांचे पथक दुपारी एक वाजता महात्मा गांधी मार्केटमध्ये वसुलीसाठी गेले होते. पथक पोहचताच गाळेधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

तसेच काही गाळेधारकांनी विरोध देखील केला होता. मात्र उपायुक्त प्रशांत पाटील यांनी थकबाकी असलेल्या रकमेतून काही रक्कम भरण्याची मुभा दिली. त्यामुळे १५ गाळेधारकांकडून थकबाकीची २० लाखांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com