ग्रामपंचायतींची वसुली : बिडिओ, डेप्युटी सीईओेंवर ठपका

जि.प.सभेत सत्ताधार्‍यांसह विरोधी सदस्यांनी डागली तोफ; वार्षिक प्रशासन अहवाल नामंजूर
ग्रामपंचायतींची वसुली : बिडिओ, डेप्युटी सीईओेंवर ठपका

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची (Gram Panchayats) बिडीओंनी 70 ते 72 टक्के वसुली (Recovery) दाखवून आकडेवारी फुगवली आहे. मात्र,प्रत्यक्षात ग्रामपंचायतींची वसुली 50 टक्कयांच्या आतच आहे.बिडिओंनी तालुक्यातून सादर केलेली आकडेवारीमध्ये मोठी तफावत (difference) असूनही ग्रामपंचायतीचे उपमुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी (Deputy Chief Executive Officer) वसुलीची पडताळणी न करता हा अहवाल जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) सर्वसाधारण सभेत पुन्हा पटलावर कसा ठेवला? असा सवाल शिवसेनेचे जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन (Shiv Sena's ZP member Nanabhau Mahajan) व भाजपचे जि.प.सदस्य मधुकर काटे (BJP's ZP member Madhukar Kate) यांनी उपस्थित केला.

मागील सभेत हा विषय नामंजूर करण्यात आलेला होता. तरीही वार्षिक प्रशासन अहवाल आजच्या सभेत मंजुरीचा घाट रचून जि.प.अधिकार्‍यांना डाव हाणून पाडला. त्यामुळे बिडीओ व उपमुख्यकार्यकारी अधिकार्‍यांवर ठपका ठेवून सीईओंनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हा चुकीचा अहवाल शासनाकडे पाठवा,असा निर्णय सोमवारी झालेल्या सभेत घेण्यात आला. त्याला जि.प.अध्यक्षा ना.रंजना पाटील यांनी संमती दिली.तसेच पुढील टेंडर मंजुरीचे अधिकार जि.प.अध्यक्षा ना.रंजना पाटील व सीईओ डॉ.पंकज आशिया यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दि.3 जानेवारी रोजी जि.प.अध्यक्षा ना.रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली र्आनलाईन घेण्यात आली. या सभेला जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती राकेश पाटील, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्जवला म्हाळके,सीईओ डॉ.पंकज आशिया, उपमुख्यकार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे-पवार, डिगंबर लोखंडे आदी ऑनलाइन सहभागी होते.

यासभेला जि.प.सदस्य मधुकर काटे, नंदकिशोर महाजन, रावसाहेब पाटील, नानाभाऊ महाजन, प्रतापराव पाटील, पवन सोनवणे,गोपाल चौधरी, अमित देशमुख, प्रभाकर सोनवणे, शशिकांत साळुंके, रवींद्र नाना पाटील,पल्लवी सावकारे, अरुणा पाटील,डॉ.प्रा.निलीमा पाटील यांच्यासह इतर सदस्य चर्चेत सहभागी होते.दरम्यान, या सर्वसाधारण सभेला बीडिओ हजर नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असता सर्व गटविकास अधिकार्‍यांची हजेरी घेण्यात आली. यात चाळीसगाव व जामनेर गट विकास अधिकारी गैरहजर तर पारोळा गट विकास अधिकारी हे आमदारांच्या बैठकीला ऑनलाइन हजर असल्याचे समोर आले.

गैरहजर बीडिओंना नोटीस बजावण्याचे आदेश

सर्वसाधारण सभेत जि.प.सदस्य पोटतिडकीने विषय मांडत असतांना संबंधित गटविकास अधिकारी बैठकीत हजर राहत असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्वसाधारण सभेत महत्वाचे विषय असतांना गटविकास अधिकारी गैरहजर राहतात कसे ? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी जि. प. अध्यक्षा ना. रंजना पाटील यांनी गैरहजर गट विकास अधिकार्‍यांना तत्काळ नोटीस बजावण्याचे आदेश दिलेत.

जि.प.मालकीच्या जागांवर महापालिकेकडून वसुलीचे काय?

जळगाव महापालिकेच्या जागेवरील कर महापालिका जिल्हा परिषदेकडून सक्तीने कर आकारणी करत आहे. मात्र जिल्हा परिषदेची जागांचा महापालिका वापरत असेल तर त्यांच्याकडून कर आकारणी का केली जात नाही? त्यांना नोटीस पाठवली का ? असा प्रश्न जि.प.सदस्य पोपट तात्या भोळे यांनी उपस्थित केला. याबाबत दोन महिन्यांपासून पत्र दिले असल्याची माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे यांनी दिली. तर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जळगाव गट विकास अधिकारी यांनी शुक्रवारपर्यंत याचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com