चाळीसगाव कृउबा समितीसाठी ९८.९९ टक्के विक्रमी मतदान

ढिसाळ नियोजन, पोलिसांचा सोम्य लाठीचार्ज, ढगाळ वातावरणात विमानाची भरारी, की कपबशीतील आर्थिक चहा गरम पडणार, मतदानाचा वाढीव टक्का कोणाच्या पथ्यावर ?
चाळीसगाव कृउबा समितीसाठी ९८.९९ टक्के विक्रमी मतदान

मनोहर कांडेकर

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) निवडणुकीसाठी (election) आज (दि,२८) रोजी मतदान प्रक्रिया दिवसभर गोंधळाच्या वातावरणात पार पडली. एकूण २३९८ मतदात्यापैकी २३७४ मतदात्यांची मतदानाचा हक्क बजवल्यामुळे दुपारी चार वाजपर्यंत ९८.९९ टक्के मतदान झाले. प्रशसन व पोेलीस यंत्रणेच्या ढिसाळ नियोजानामुळे मतदान केंद्रावर दिवसभर दोन्हीकडील उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये तु..तु., मै..मै झाल्यामुळे गर्दी पागविण्यसाठी पोलिसांना दोनदा सोम्य लाठीचार्ज करावा लागला. तर मतदान केंद्रापर्यंत थेट उमेदवार जात असल्यामुळेे संपूर्ण निवडणुक यंत्रणाच विक्री झाली होती का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

चाळीसगाव कृउबा समितीसाठी ९८.९९ टक्के विक्रमी मतदान
जळगाव मतदान केंद्रावर बोगस मतदानावरुन गोंधळ

चाळीसगाव कृषी उत्पन्न बजार समितीच्या निवडणुकीसाठी येथील राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज कन्या शाळा येथील एकूण आठ मतदान केंद्रांवर संकाळी ८ ते ४ यावेळेत गोंधळाच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. सुरुवातीपासूनच मतदात्यांमध्ये उत्साह दिसून येत असल्यामुळे मतदान केंद्रासह मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. संकाळपासून मतदानाचा टक्का चांगला असल्यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत ९८.९९ टक्के मतदान झाले. एकूण २३९८ मतदात्यापैकी २३७४ मतदात्यांची मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी एकूण आठ मतदान केद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी तब्बल ६० आधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती.

ढिसाळ नियोजनामुळे दोनदा सौम्य लाठीचार्ज-

चाळीसगांव उत्पन्न कृषी बाजार समिती निवडणूकीसाठी मतदान प्रक्रियेला संकाळी ८ वा. सुरूवात झाली ही प्रक्रियेत शांततेत सुरू होती. परंतू सकाळी १०.३० वोजच्या सुमारास मतदानासाठी जाण्याच्या मार्गावरून मतदान केंद्रा बाहेर दोन्ही पॅनलच्या उमदेवारांचे वाद झाले. यात दोन्हीकडील उमेदवारांनी एकमेकांना थक्का-बुक्की देखील केली. त्यामुळे पोलिसांना वेळीच दोनदा सौम्य लाठीचार्ज करावा लागला.दुपारी १२ वाजेच्या सुमारास मतदान केंद्र परिसरात उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी फिरत असल्याचे कारणावरून पुन्हा दोन्ही पॅनलच्या समर्थकांमध्यें वाद झाला. दोन्ही गट एकमेकांना भिडण्याच्या तयारीत असतांना पोलिसांना पुन्हा एकदा लाठीचार्च करून गर्दीला पिटाळून लावणे भाग पडले. निवडणुक यंत्रणा व पोलीस प्रशसानच्या ढिसाळ नियोजनामुळे दिवभर गोंधळाच्या वातावरणात निवडणुक प्रक्रिया पार पडली. नियोजन नसल्यामुळे उमेदवार हे थेट मतदान केंद्रपर्यंत प्रचारासाठी व मतदात्यांवर प्रेशर निर्माण करण्यासाठी फिरताना दिसून आले. पोलीस यंत्रणा सुध्दा फक्त नावापुरताच उमेदवारांना हटकत होती. पोलीस यंत्रणेसह निवडणुक आधिकारी यांना देखील जड वजानाचे पाकीट दिल्यामुळे ते फक्त बघ्याची भूमीका घेत असल्याची चर्चा मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठांनी सखोल चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

ढगाळ वातारणात विमानाची भरारी की, कपबशीचा आर्थिक चहा गरम पडणार-

बाजार समितीच्या १८ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात असून भाजपा शिवसेना व महायुती प्रणित कपबशी या चिन्हावर स्व.रामराव जिभाऊ स्मृती शेतकरी सहकार पॅनल तर महाविकास आघाडीचे विमान या चिन्हावर शेतकरी विकास पॅनल निवडणुकीच्या मैदानात आहेत. वर्षाला सुमारे २०० कोटी रूपयांची उलाढाल होणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी विशेषत: भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी महत्वाची असल्यामुळे दोन्ही गटाकडून मतदारापर्यंत पैशांचे वाटप करण्यात आल्याची चर्चा आहे. एक पॅनलकडून घरपोच विमानाच्या वेगाने रात्रभर पाच ते सहा हजारांचे पाकीट वाटप करण्यात आले. तर दुसर्‍या पॅनलाकडून तब्बल १० ते २० हजारांचे पाकीट वाटप करण्यात आले असून निवडुन आल्यानतंर पुन्हा २० हजारांचा आर्थिक चहा कपबशीत देण्यात येणार आहे. त्यासाठी २० रुपयांची नोट टोकण म्हणून देण्यात आल्याची माहिती नाव न सांगण्याच्या हटीवरुन एका पदाधिकार्‍यांने दिली. त्यामुळे शुक्रवारी असलेल्या मतदानाच्या ढंगाळ वातावरण विमान भरारी घेते, की कपबशीतील आर्थिक चहा गरम पडणार अशी चर्चा दिवसभर होती.

व्यापारी व ग्रामपंचायत (अनु.जाती/जमाती) संघात धक्कादायक निकाल लागणार-

बाजार समितीत संपूर्ण पॅनला निवडणुक येण्यासाठी दोन्ही गटाकडून मोठया प्रमाणात पैशाची वाटप करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यातही व्यापारी संघ व ग्रामपंचायत(अनु.जाती/जमाती) संघात तब्बल १० ते २० हजारांचे पाकीट वाटप करण्यात आले असून ५ ते २० हजार रुपयांपर्यंत टोकणही देण्यात आले आहे. निवडुन आल्यानतंर पुन्हा मतदात्यांना ५ ते २० हजार रुपये मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे व्यापारी व ग्रामपंचायत संघात धक्कादायक निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही गटातील उमेदवार थेट मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मनधरणी करणाता दिसून आले. तर इतर मतदार संघात देखील अनपेक्षीत निकाल लागण्याची चिन्ह दिसत असून शुक्रवारी झालेल्या मतदानावरुन कपशीतील आर्थिक चहा गरम पडणार असल्याचे दिसत असून ढगाळ वातावरणात विमान गिरड्या घालणार असल्याचे बोलले जात आहे.

चाळीसगाव कृउबा समितीसाठी ९८.९९ टक्के विक्रमी मतदान
जळगाव मतदान केंद्रावर बोगस मतदानावरुन गोंधळ

मतदरांची मज्जाच मज्जा

बाजार समितीच्या १८ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणुकीला चांगलेच महत्व प्राप्त झाले. दोन्ही पॅनलकडून प्रत्येक मतदारांपर्यंत १० ते २० हजार रुपयांचे पाकीट पोहचत करण्यात आल्याची चर्चा काल दिवसभर होती. तर मतदात्यांनी थेट मतदान केंद्रापर्यंत आनण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्राबाहेरच्या परिसरात मतदात्यांना बसण्यासाठी मडप, कुलरसह सोपा व खुर्च्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच जेवणासाठी खास पुलाव व नाष्टा ठेवण्यात आला होती. त्यामुळे तालुक्यात यंदा प्रथमच बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांची मज्जाच मज्जा झाल्याची चर्चा होती.

मतदानाचा वाढीव टक्केवारी कोणाच्या पथ्यावर

बाजार समितीच्या मागील वर्षीच्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाची टक्के वाढली असून ती ९८.९९ टक्क्यावर जावून पोहचली आहे. त्यामुळे वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडते हे पाहणे सारखे असून पाकीटा संस्कृतीमुळे धक्कादायक निकाल लागल्याची चिन्ह दिसत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com