धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विक्रमी मतदान

२८९७ पैकी २५९६ मतदान : शेकडा ८९.६१ %मतदान झाले.
धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विक्रमी मतदान

धरणगाव Dharangaon प्रतिनिधी

धरणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती (Dharangaon Taluka Agricultural Produce Market Committee) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत (election) विक्रमी 89.61 टक्के मतदान (Record turnout ) झाले. बहुप्रतीक्षित अश्या या निवडणुकीत मतदारांची अक्षरश: चांदी झाल्याची चर्चा सर्वत्र रंगलेली आहे. 

सोसायटी मतदारसंघातील सर्व गट (सर्वसाधारण, महिला, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती) यातील पहिल्या केंद्रावर 260 पैकी 236 मतदान झाले मतदान केंद्र क्रमांक दोन वर 260 पैकी 241 मतदान झाले तर मतदान केंद्र क्रमांक तीनवर 260 पैकी 223 मतदान झालेसोसायटी मतदार संघ सर्व गट (सर्वसाधारण, महिला, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती) मतदान केंद्र क्रमांक चारवर 221 पैकी 189 मतदान झाले

तर मतदान क्रम केंद्र क्रमांक पाचवर 28 पैकी 220 मतदान झालेग्रामपंचायत मतदार संघ सर्व गट (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती, आर्थिक दुर्बल घटक) यात केंद्र क्रमांक सहावर 257 पैकी 244 मतदान झाले तर केंद्र क्रमांक सातवर 287 पैकी 269 मतदान झालेग्रामपंचायत मतदार संघ सर्व गट (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती, आर्थिक दुर्बल घटक) यात केंद्र क्रमांक आठवर 240 पैकी 237 मतदान झाले

तर केंद्र क्रमांक 90 225 पैकी 222 मतदान झालव्यापारी मतदारसंघ मतदान केंद्र क्रमांक दहावर 330 पैकी 241 मतदान झाले. हमाल मापारी मतदारसंघ केंद्र क्रमांक 11 वर 310 पैकी 274 मतदान झालेया सर्व मतदान प्रक्रियेमध्ये एकूण 2897 मतदारांपैकी 2596 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदान 89.61% इतके झाले आहे. मतदानात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. अनेक दिवसांनी निवडणूक झाल्यामुळे निवडणुकीत प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून आले. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com