राष्ट्रीय एकात्मतेसाठी नमाज पठण

रमजान ईदनिमित्त सामाजिक सलोख्याचे घडले दर्शन
राष्ट्रीय एकात्मतेसाठी नमाज पठण

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

अल्लाह (Allah) संपूर्ण विश्वात शांती (Peace in the universe) नांदू दे, भारतात जे काही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे त्याला आळा घाल व आम्हा सर्व समाजाला एकोप्याने (Unity) ठेव, अशा आशयाची प्रार्थना ((Prayer) मौलाना उस्मान कासमी (Maulana Usman Kasm) यांनी केली असता हजारोच्या संख्येने उपस्थित नमाजी यांनी त्यावर आमीन शब्द उच्चारून त्यास अनुमोदन दिले.

जळगाव मुस्लिम ईदगाह ट्रस्टतर्फे (Muslim Idgah Trust) अजिंठा चौकावरील मुस्लिम ईदगाह मैदानावर रमजान ईदच्या (Ramadan Eid) नमाजचे आयोजन केले होते. त्यासाठी इदगाह मैदानावर सुमारे पंचवीस ते तीस हजारच्यावर लोकांनी नमाज (Namaz) अदा केली. मुस्लिम ईदगाह ट्रस्टतर्फे सर्वप्रथम अध्यक्ष अब्दुल वहाब मलिक यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या तर जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी सेक्रेटरी रिपोर्ट सादर केला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध सहा ठराव पारित करण्यात आले. मौलाना उस्मान कासमी यांनी नमाज पठण केले त्यानंतर दुआ केली व सर्वात शेवटी अरबी खुदबा सादर करून ईदची नमाज संपल्याचे घोषित केले.

एकमेकांना दिल्या शुभेच्छा

ईदगाह मैदानावर नमाज पठण झाल्यानंतर जे लोक बाहेर जात होते त्यांना प्रशासनामार्फत (Administration) तसेच काही राजकीय पक्ष व महापौर जयश्री महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा (greetings) दिल्या. यात प्रामुख्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व अ‍ॅड. रवींद्र भैय्या पाटील यांनी ईदच्या शुभेच्छा प्रत्यक्ष भेटून दिल्या.

Related Stories

No stories found.