मनपा आयुक्तपदी डॉ.विद्या गायकवाड यांची पुन्हा नियुक्ती

शुक्रवारी सायंकाळीच स्विकारला पदभार; अधिकार्‍यांची घेतली बैठक
मनपा आयुक्तपदी डॉ.विद्या गायकवाड यांची पुन्हा नियुक्ती

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महापालिका आयुक्तपदाचा (Municipal Commissioner) तब्बल दोन महिन्यांनी तिढा अखेर सुटला आहे. डॉ.विद्या गायकवाड (Dr.Vidya Gaikwad) यांची पुन्हा राज्यशासनाने जळगाव महापालिका आयुक्तपदी नियुक्तीचे (Re-appointment) आदेश काढून नियुक्त केले आहे. तसेच सायंकाळी सात वाजता डॉ. गायकवाड यांनी महापालिकेत येवून पुन्हा आपल्या पदाचा पदभार स्विकारत अधिकार्‍यांची बैठक घेत विभागातील कामांचा आढावा घेतला.

मनपा आयुक्तपदी डॉ.विद्या गायकवाड यांची पुन्हा नियुक्ती
अन् फुले मार्केटमध्ये काढली गुन्हेगारांची धिंड

जळगाव महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची 29 नोव्हेंबर 2022 रोजी तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले होते. त्यांनी मॅट (महाराष्ट्र डमिनीस्टेटीव्ह ट्रीब्युनल) मध्ये आव्हान दिले होते. त्यावर तब्बल दोन महिन्यांनी मॅटने निकाल जाहिर केला. यात आयुक्त देविदास पवार यांच्या बदली आदेश रद्द केली होते. पुन्हा आयुक्तपदी शासनाने नियुक्ती करावे असे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी शासनाच्या नगरविकास विभागाने डॉ. विद्या गायकवाड यांची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्त जळगाव महानगरपालिका पदावर आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश काढले. तसेच विद्या गायकवाड यांनी जळगाव महापालिका आयुक्तपदाचा कारभार स्विकारून शासनास अनुपालन अहवाल सादर करावा असे आदेशात म्हतले आहे.

मनपा आयुक्तपदी डॉ.विद्या गायकवाड यांची पुन्हा नियुक्ती
आयशर आणि कारच्या धडकेत एक ठार

आदेश निघताच स्विकारला पदभार

सायंकाळी सहा वाजता शासनाचा अध्यादेश प्राप्त होताच डॉ.विद्या गायकवाड सायंकाळी सात वाजता महापालिकेत येत दालनात त्यांनी पदभार घेतला. त्यामुळे महापालिकेतील गेल्या दोन महिन्यापासून थांबलेली विकास कामे पुन्हा सुरू होतील अशी अपेक्षा आहे.

प्रलंबीत कामे मार्गी लावणार

पदभार घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या, शहरातील प्रलंबीत प्रश्न मार्गी लावू, रस्त्याची थांबलेले कामांना गती दिली जाणार. पार्किंग झोन त्वरीत करण्यात येईल, तसेच फुले मार्केटच्या अतिक्रमणाचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी उपायोजना करणार असल्याचे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com