रेमंडच्या पतपेढीवर ‘कामगार उत्कर्ष पॅनल’चे वर्चस्व

रेमंडच्या पतपेढीवर ‘कामगार उत्कर्ष पॅनल’चे वर्चस्व

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

रेमंड कर्मचारी सहकारी पतपेढी लिमिटेड (Raymond Employees Cooperative Credit Bureau Ltd.) पतसंस्थेच्या संचालक मंडळाची (Board of Directors) निवडणूक (Election) आज पार पडली. या निवडणुकीत कामगार उत्कर्ष पॅनलने 8 जागांवर आपले उमेदवार विजयी (Victorious) करीत सहकार पॅनल केवळ 2 उमेदवार विजयी झाल्याने सहकार पॅनलचा दारुण पराभव झाला. त्यामुळे रेमंडवर पुन्हा एकदा कामगार उत्कर्ष पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध करीत ते कायम ठेवले आहे.

रेमंड कर्मचारी सहकारी पतपेढी लिमिटेड पसंस्थेच्या (Raymond Employees Cooperative Credit Bureau Ltd.) संचालक मंडळाच्या 10 जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया पडली. या निवडणुकीत कामगार उत्कर्ष (Worker upliftment) व सहकार पॅनल (Co-operation Panel) या दोघ पॅनलने आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.

निवडणुकीपूर्वीच सहकार पॅनलचा एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी 4 वाजेपर्यंत शांततेत मतदानाची प्रक्रिया (voting process) पार पडली. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला 9 पैकी 7 जागांवर कामगार उत्कर्ष पॅनलचे उमेदवार निवडून आले तर उर्वरित 2 जागांवर सहकार पॅनलच्या उमेदवरांनी विजय (Victorious) मिळविला होता. परंतु सहकार पॅनलच्या एक उमेदवार 2 मतांनी विजयी झाल्याने त्या विजयी उमेदवारावर उत्कर्ष पॅनलने आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानुसार एका जागेसाठ फेरमतमोजणीला सुरुवात झाल्याने उत्कर्ष पॅनलच्या उमेदवाराने सात मतांनी त्या जागेवर विजयी मिळविला होता.

सहकार पॅनलचा आक्षेप

एका जागेसाठी झालेल्या फेरमतमोजणीत कामगार उत्कर्ष पॅनलच्या उमेदवार 7 मतांनी निवडून आल्यानंतर सहकार पॅनलने (Cooperation panel) संपूर्ण मतमोजणीवर आक्षेप (Objection) घेत मत मोजणीची प्रक्रिया पुन्हा करण्याची मागणी केली. त्यानुसार सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती.

कार्यकर्ते आमने-सामने

मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात झाल्याने एक-एक जागांचे निकाल निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करीत होते. दोन्ही पॅनलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रेमंड कंपनीच्या (Raymond Company )परिसरात गर्दी केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांचा (police) फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

विजयी उमेदवारांचा जल्लोष

रेमंड कंपनीवर गेल्या अनेक वर्षांपासून कामगार उत्कर्ष पॅनलचे वर्चस्व आहे. दरम्यान, यंदा या पॅनल विरोधात सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. परंतु सहकार पॅनलचा कामगार उत्कर्ष पॅनलने दारुन पराभव केल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत रेमंडवर उत्कर्ष कर्मचारी संघटनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. दरम्यान, या पॅनलच्या विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

सहकार पॅनलचे उमेदवार 2 मतांनी विजयी

फेरमतमोजणीची प्रक्रिया रात्री उशिरा पार पडली. यानंतर निवडणुकी निर्णय अधिकार्‍यांनी वियजी उमेदवारांची घोषणा केली. यावेळी कामगार उत्कर्ष पॅनलच्या (Worker Prosperity Panel) उमेदवारांनी 8 जागांवर विजयी झाले. तसेच निवडणुकीपूर्वी सहकार पॅनलचा एक उमेदवार बिनविरोध झाला होता. दरम्यान पुन्हा एक उमेदवार केवळ 2 मतांनी विजयी झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.एस.गोसावी व चेतन राणे यांनी कामकाज पाहिले.

विजयी उमेदवार- जगदिश तुकाराम बोरोले, राजेंद्र वसंत जंगले, घनश्याम ज्ञानदेव काळे, चंद्रकांत पितांबर लोखंडे, रवींद्र पीतांबर पाटील, सतीश रामकृष्ण पाटील, किरण भागवत खडके, नवल विकास धनगर, बाबूलाल तानाजी अहिरे तर महिला राखीवमधून सुरेखा अर्जुन चौधरी हे उमेदवार विजयी झाले आहे.

पराभूत उमेदवार-प्रशांत चिंतामण धांडे, किशोर मुकुंदा पाटील, मिलिंद प्रल्हाद पाटील, शुभम अनिल पाटील, प्रवीण चावदस पवार, सुजित भाऊलाल विसपुते, अनंत अंबादास शिंगरुपे, विलास शालिग्राम झोपे, विजय वामनराव इप्पर, राहूल धनसिंग ठाकूर हे उमेदवार पराभूत झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com