
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
रेमंड कंपनीतील (Raymond Company) कर्मचार्यांना (employees) गेल्यावेळेस पेक्षा कमी वेतनवाढ (Low pay rise) दिल्यामुळे कर्मचार्याांनी कामबंद आंदोलन (Work stoppage movement) पुकारले आहे. यामुळे रेमंड कंपनीच्या आवारात तणावाचे वातावरण (Stressful environment) निर्माण झाल्याने याठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात (Strict police presence) करण्यात आला होता.
एमआयडीसी परिसरातील रेमंड कंपनीकडून वेतनवाढ करण्यात आली आहे. परंतु गेल्या चार वर्षांपुर्वी झालेल्या वेतनवाढीच्या तुलनेत यंदा त्यापेक्षा कमी वेतनवाढ झाली आहे. शनिवारी दुपारी वेतनवाढ संदर्भात कंपनीच्या बोर्डवर नोटीस लावण्यात आली होती. परंतु कंपनीकडून करण्यात आलेली वेतनवाढ ही यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक होण्यापेक्षा कमी झाल्याने कर्मचार्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होवून त्यांनी शनिवारी सायंकाळपासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.
रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर आले. परंतु कंपनीच्या व्यवस्थापनाने त्यांना आत प्रवेश दिला नसल्याने अनेक कर्मचारी माघारी निघून गेले तर काहींनी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडला होता. याठिकाणी कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
स्वाक्षरी करणार्यालाचा कामावर हजेरी
व्यवस्थापनाकडून त्यांना वेतनवाढ झालेल्या फॉर्मवर स्वाक्षरी केली तरच आत प्रवेश दिला जात होता. परंतु कर्मचार्यांनी अर्जावर स्वाक्षरी करण्यास मनाई केल्याने कर्मचार्यांना कामावर देखील हजर होवू देत नसल्याचे त्यांनी सांगितले.
कर्मचार्यांवर स्वाक्षरीसाठी दबाव
कंपनीकडून लावण्यात आलेल्या वेतनवाढीच्या नोटीवर कुठल्याही संघटनेच्या पदाधिकार्यांसह कुणाचाही स्वाक्षरी नव्हती. तसेच कंपनीकडून करण्यात आलेल्या पगारवाढीच्या अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी कामागार उत्कर्ष सभा या संघटनेकडून कर्मचार्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप कर्मचार्यांनी केला आहे.
व्यवस्थापनाची चुप्पी
शनिवारी दुपारपासून पुकारण्यात आलेल्या कामबंद आंदोलनाामुळे अनेक कर्मचारी कंपनीत असून त्यांनी देखील कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहे. याबाबत कंपनीच्या व्यवस्थपानाकडून कुठल्याही प्रकारााची प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही.