रवी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे ; गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील

जळगाव - jalgaon

विदर्भातील (Vidarbha) वादाची राज्यभर चर्चा रंगत आहे. रवी राणा (Ravi Rana) हे अपक्ष आमदार असले तरी त्यांनी भाजपला (bjp) पाठींबा दिल्याने ते सध्या तरी भाजपचेच आहे असे म्हणणे उचित ठरेल, तर बच्चू कडू व रवी राणा यांच्यामध्ये जे वाक्ययुद्ध सुरु आहे, त्याचे पडघम आता राज्यात वाजू लागले आहे,

गुलाबराव पाटील
Video मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तीन मिनिटात मंजूर केला सव्वा सात कोटीचा निधी

तुमच्या जिल्ह्याच्या वादामुळे राज्याच्या 40 आमदारांची बदनामी करण्याची गरज नाही, एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सगळ्यांवर आरोप करणे असा होतो, त्यामुळे रवी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे, कोणी विकावू नाही या गोष्टीचा अभ्यास देखील त्यांनी केला पाहिजे. त्यासोबतच रवी राणांना आवर घालावा, असे मत शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी व्यक्त केले. ते जळगाव येथे माध्यमांशी बोलत होते.

बच्चू कडू आणि रवी राणा यांची लढाई आरपारची असल्याचे बोलले जात आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांची समज घातली पाहिजे आणि या विषयाचा पडदा पाडला पाहिजे. एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सगळ्यांवर आरोप करणे असे मला वाटते, त्यामुळे रवी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे असे आवाहन गुलाबराव पाटलांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com