रावेरचे माजी आमदार अरुण पाटील भाजपच्या संपर्कात

जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचाली गतिमान
रावेरचे माजी आमदार अरुण पाटील भाजपच्या संपर्कात
USER

रावेर|प्रतिनिधी raver

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रावेरच्या जागेवर काँग्रेसने दावा केल्याने, इच्छुक असलेले उमेदवार माजी आमदार अरुण पाटील भाजपच्या संपर्कात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अरुण पाटील हे माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते आहेत, ते जिल्हा बँकेसाठी इच्छुक उमेदवार होते, मात्र सर्वपक्षीय पॅनल कडून काँग्रेसच्या जनाबाई महाजन यांचे नावं समोर आल्याने, अरुण पाटील भाजपच्या संपर्कात असून त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याने, खडसेंच्या गटाला जोरदार धक्का बसेल अशी चर्चा तालुक्याच्या राजकारणात सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com