महिला प्रवाशांशी अरेरावी, रावेरला चालक निलंबित

एसटी
एसटी

रावेर raver |प्रतिनिधी 

महिला प्रवाशांनी भुसावळ येथून रावेरकडे येणाऱ्या बसला हात दाखवूनही चालकाने (driver) गाडी थांबवली नव्हती. यानंतर महिला प्रवाशांनी (women passengers) सावदा गाठून चालक टी. आर. शेख यांना जाब विचारला होते. पण, त्यांनी अरेरावी (misbehavior) केल्याची तक्रार मंगळवारी विभागीय नियंत्रकांकडे झाली होती. त्याची दखल घेत रावेर डेपोचे चालक शेख यांच्यावर निलंबनाची (suspended) कारवाई करण्यात आली आहे.

 सोमवारी रावेर डेपोची बस (क्रमांक २३९८) भुसावळ येथून रावेरकडे येत होती. त्यावेळी गांधी पुतळ्याजवळ काही महिला प्रवाशांनी बसला हात दाखवून थांबवण्याची विनंती केली. मात्र, चालक शेख यांनी बस थांबवली नव्हती. त्यामुळे मागून आलेल्या जळगाव-तांदलवाडी बसने या महिला प्रवासी सावदा येथे आल्या. तेथे उभे असलेले बसचालक शेख यांना बस का थांबवली नाही? अशी विचारणा केली.

यावेळी शेख यांनी महिलांसोबत अरेरावी केली. यानंतर संतप्त प्रवाशांनी झालेल्या प्रकाराची विभागीय नियंत्रकांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत संबंधित चालक टी. आर. शेख यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिस्त व अपील कार्य पद्धतीच्या नियमानुसार ही कारवाई झाली. पुढील आदेश येईपर्यंत शेख यांचे निलंबन झाले. त्यांना दररोज आगर प्रमुखांसमोर हजेरी लावण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com