नियम मोडणाऱ्या मंगलकार्यालयांवर दंडात्मक कारवाई

रावेर पालिकेने कारवाईसाठी नेमले पथक
नियम मोडणाऱ्या मंगलकार्यालयांवर दंडात्मक कारवाई

रावेर|प्रतिनिधी Rver

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्तीला प्रतिबंध असूनही, नियमांचे पालन न करणाऱ्या मंगलकार्यालयावर पालिकेने दंडात्मक कारवाई मोहीम सुरु केली आहे. यात शहरातील अग्रसेन भवन मंगल कार्यालय, माजी सैनिक मंगल कार्यालयावर, महाराजा मंगलकार्यालयावर कारवाई झाली आहे.

पालिकेने विना मास्क वापरणाऱ्या नागरिकांवर तसेच किराणा दुकाने,शॉपिंग मॉल या ठिकाणी मास्क न वापणाऱ्या लोकांवर कारवाईसाठी पथक नेमले आहे. या पथकाने रविवारी शहरातील सावदा रोडवरील अग्रसेन भवन, जुना सावदा रोडवरील माजी सैनिक मंगलकार्यालय,बऱ्हाणपूर रोडवरील महाराजा मंगल कार्यालयात परवानगी पेक्षा अधिक व्यक्ती विना मास्क आढळून आल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी ३ हजार रुपयाप्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे.या मोहिमेत सर्फराज तडवी,श्यामकांत काळे,पांडुरंग महाजन,प्रमोद चौधरी,युवराज गोयर,दीपक सुरवाडे,सुभाष महाजन,शांताराम पाटील,प्रकाश शिंदे,अशोक माळी,आदी कर्मचारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com