
रावेर raver |प्रतिनीधी
रावेर बाजार समितीची निवडणूक ( Raver Krishi Bazar Samiti Election) आता १२ दिवसांवर येवून ठेपली आहे.अशात भाजपकडून (BJP )संथ गतीने हालचाली होत असल्याने, नेमकी उमेदवारी कुणाला मिळेल याबाबत उमेदवारांमध्ये (candidate) संभ्रम आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या नियोजनाबाबत भाजप किसान मोर्चाचे (BJP Kisan Morcha) उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख सुरेश धनके यांच्याशी संपर्क केला असता,त्यांनी रावेर बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष आ.मंगेश चव्हाण (MLA. Mangesh Chavan) लक्ष देणार असून,त्यांच्या मार्गदर्शनाने निवडणुकीची व्यूहरचना आखणी होत आहे.एका भेटीत मंत्री गिरीश महाजन यांच्याशी याबाबत बोलणे झाले आहे.
त्यावेळी गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत आ.मंगेश चव्हाण यांनी बाजार समिती निवडणुकीत लक्ष द्यावे हि विनंती केली होती.त्याला मंगेश चव्हाण यांनी होकार दिला असल्याची माहिती सुरेश धनके यांनी देशदूतशी बोलतांना दिली.
रावेर बाजार समितीत १८ जागांसाठी १४० उमेदवार रिंगणात आहे.भाजप-शिंदे गट पॅनल विरुद्ध महाविकास आघाडीचे पॅनल असा सामना या निवडणुकीत होणार असला, तरी माघारीसाठी अवघे ४ दिवस शिल्लक असतांना,दोन्ही बाजूने पॅनल जाहीर करण्यात मागेपुढे होत आहे.
तर भाजपचे नेते सुरेश धनके यांनी निवडणुकीत पूर्ण तयारी झाली असून संपूर्ण १८ जागांचे उमेदवार निश्चित झाल्याचे सांगितले.तर भाजपच्या पॅनलमध्ये कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांचा देखील समावेश असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकार्यांनी नांव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. दरम्यान या निवडणूकीत अनेक मात्तबरांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
असे असू शकते भाजपचे संभाव्य पॅनल
भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून काही नांवे समोर आली आहे.भाजपचे पॅनल झाल्यास त्यात,या उमेदवारांचा समावेश असू शकतो ते पुढील प्रमाणे सोसायटी मतदार संघ प्रल्हाद पंडीत पाटील,दिलीप चुडामण पाटील, गोपाळ लक्ष्मण नेमाडे,पितांबर रामभाऊ पाटील,गोंडू रामदास महाजन,चेतन श्रावण पाटील, राहूल महाजन तर महिला राखीव मतदार संघात कल्पना उत्तमराव पाटील,सविता दिनेश पाटील,ओबीसी मतदार संघात दुर्गादास बाबुराव पाटील,भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघात अँड. प्रवीण पासपोहे, ग्रा.प.सर्वसाधारण मतदार संघात महेंद्र कडू पाटील,विजय विनायक महाजन, आर्थिक दुर्बल घटक मतदार संघात नितीन रामलाल भोगे,व्यापारी मतदार संघात रितेश संतोष पाटील हे संभाव्य उमेदवार असू शकतात. तर हमाल मापाडी व अनुसुचीत जाती जमाती या मतदार संघात अद्याप कोणतीही नांवे बाहेर आले नसुन,भाजपकडून चाचपणी सुरु आहे.
आमच्याकडे संपूर्ण १८ जागांचे उमेदवार आहे. त्यांची नांवे लवकर जाहीर करणार आहे, ही निवडणूक ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष आ. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. निवडणूकीत मतदारांचा मोठा पाठींबा आम्हाला मिळत आहे.
सुरेश धनके ,भाजप किसान मोर्चा संपर्क प्रमुख