
रावेर - Raver - प्रतिनिधी :
पोलीस यंत्रणेने अचूक तपास करून आम्ही गुन्हा कबुल असल्याचे सांगितल्यावर सुद्धा कोणतेच धागेदोरे जुळत नसल्याने,पोलिसांची खात्री पटत नव्हती.
पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी विविध वैधानिक पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारावर बोरखेडा हत्याकाडांचा मुख्य सूत्रधार शोधून काढल्याने, आधीचे संशयित तिघे निर्दोष सुटल्याची प्रतिक्रिया या घटनेचा संशयित असलेल्या गुड्डू याने सोमवारी दिली.
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बोरखेडा हत्याकांडानंतर पोलिसांपुढे तपासाचे मोठे अव्हान निर्माण झाले होते. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व त्यांचे सहकारी चंद्रकांत गवळी दोन्ही जिल्ह्यात नवीन अधिकारी असल्याने, त्यांच्यावर तपासाचा मोठा दबाब जाणवत होता.
मात्र पोलीस अधीक्षक डॉ.मुंडे यांनी सायबर सेल व विविध विभागाच्या पोलिसांच्या मदतीने या गुन्ह्यातील बारकावे तपासून प्रयोगशाळेतील रिपोर्ट व संशयिताचे लोकेशन तपासून सर्व घटनाक्रम पडताळून.
यातील मुख्य आरोपीपर्यंत पोहचून पकडण्यात आलेल्या तीघ संशयितांना कोणताही गुन्हा नसल्याचे समोर आल्यावर,या तिघांचा जीव भांड्यात पडला.त्यांनी खून व बलात्कार केल्याची कबुली दिली होती.
मात्र त्यांचे मोबाईल लोकेशन,व त्यांचे डीएनए रिपोर्ट विसंगती दर्शवत असल्याने,पोलीस यंत्रणेपुढे तपासाची गूढ वाढत होते.मुख्य आरोपी महेंद्र बारेला याने दारू रिचवून थेट बोरखेडा येथील घटनास्थळ गाठून चार निरागस भावंडाची हत्या व १४ वर्षीय युवतीवर अत्याचार करून पळ काढला होता.
त्याच्या रक्ताचे नमुने,डीएनए रिपोर्ट,मयत १४ वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची वैदकीय तपासणी व घटनाक्रम तंतोतंत जुळत असल्याने,आरोपीला पोलिसांनी केऱ्हाळे शिवारातून ताब्यात घेतले होते.त्यामुळे याघटनेतील त्या तीघ संशयित आरोपींचा बचाव झाला.नाहीतर चोर सोडून संन्याशाला फाशी असती,मात्र पोलिसांनी वस्तूनिष्ठ तपास करून मृतांना न्याय मिळवून देत,ज्यांनी कृत्य केल नव्हते त्या बेकसूर तिघांचे देखील जीवन वाचवले आहे.
या घटनेत पोलीस यंत्रणेने नुसते आरोपी शोधण्याचे काम केले नाही.अतिशय उच्च दर्जाचा तपास यंत्रणेचा वापर करून,मूळ आरोपीपर्यंत जाऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या,आरोपी आता जिल्हा कारागृहात बंदी आहे.
या घटनेतील आधीचा संशयित गुड्डू सोमवारी पोलिसांनी जप्त केलेला त्याचा मोबाईल घेण्यासाठी पोलीस स्टेशनला आला होता,त्याने मोबाईल घेतल्यावर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांची भेट घेऊन,साहेब,मी आता काम धंदा करतो,दारू पण सोडली आहे.पोलिसांनी केलेल्या योग्य तपासाने मी वाचलो नाहीतर माझ आयुष्य उध्वस्त झाले असते.
अशी भावना यावेळी व्यक्त केली.पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी त्यावेळी दिलेल्या थर्ड डिग्रीपुढे मी गुन्हा केला अशी कबुली दिली होती,मात्र यंत्रणेने यासाठी गोळा केलेले पुरावे आणि विविध रिपोर्ट मध्ये माझा व माझ्या मित्राचा सहभाग नसल्याचे पुढे आल्याने,आम्हाला सोडण्यात आले.या घटनेने खूप शिकायला मिळाले अशी प्रतिक्रिया गुड्ड्याने दिली.