कृषी अध्यादेश स्थगिती आदेशाची होळी

रावेर भाजपतर्फे राज्य सरकारविरुद्ध निषेध आंदोलन
कृषी अध्यादेश स्थगिती आदेशाची होळी

रावेर - Raver - प्रतिनिधी :

शेतकऱ्यांना सन्मान प्राप्त करून देणारे कृषी विधेयक केंद्र सरकारने लागू केल्यानंतर राज्य सरकारने या अध्यादेशाला महाराष्ट्रात स्थगिती दिली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा घणाघात करून णाऱ्या राज्य सरकारचा भाजपातर्फे निषेध करण्यात आला आला,यास्थगिती आदेशाची बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर होळी देखील करण्यात आली.

आध्यादेशाला स्थगिती दिल्यावर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे.केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक मंजूर केले असून याबाबत तसा अध्यादेश काढला आहे.

मात्र राज्य सरकारने या अध्यादेशाला स्थगिती दिली असल्याने शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य यामुळे हिरावले जाणार आहे.

शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम असणारे सत्ताधारी काँग्रेस व इतर पक्ष या विधेयाकाबद्द्ल दिशाभूल करीत आहेत.त्यामुळे भारतीय जनता पक्षातर्फे या कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती देणाऱ्या आदेशाची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर होळी करून राज्य सरकारविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले.याबाबत तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजप किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी जिल्हा सरचिटणीस डॉ विजय धांडे, तालुका सरचिटणीस सी एस पाटील, महेश चौधरी, जि प सदस्य नंदकिशोर महाजन, प स उपसभापती जुम्मा तडवी, महिला तालुकाध्यक्ष रेखा बोंडे, प स सदस्य योगिता वानखेडे, शहराध्यक्ष दिलीप पाटील, संदीप सावळे, वासुदेव नरवाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com