धृपद अंतर नाद आणि तबला पखवाजच्या जुगलबंदीत रसिक तल्लीन

बालगंधर्व महोत्सव
धृपद अंतर नाद आणि तबला पखवाजच्या जुगलबंदीत रसिक तल्लीन

जळगाव jalgaon

भारतीय संगीताच्या (Indian music) अभिजात अंगापैकी महत्त्वाचे असलेले धृपद अंतर नादाने (Dhrupad antar nada) जळगावकर रसिक मंत्रमुग्ध झाले. देव देवतांची अनुभूती विनोदकुमार व्दिवेदी, आयुष व्दिवेदी यांचे धृपद गायन उध्दवराव आपेगावकर यांची पखावजावर उपज अंगाने साथ दिली हे आजच्या बालगंधर्व महोत्सवाच्या (Balgandharva Festival) प्रथम सत्राचे आकर्षण होते.

आजच्या कार्यक्रमाच्या सुरूवातीला राग केदार मधील आलाप जोड आणि झाला सादर केला. बोल होते 'चंद्र बदन मृग नयनी ही' त्यानंतर चौतालातील बंदिश सादर केली. कार्यक्रमात पुढे सुल तालात निबध्द पंडित विनोदकुमार व्दिवेदी यांची स्वरचित बंदिश 'जय जय हनुमान महाबली महान' हि रचना सादर केली. त्यानंतर पं.विनोदजी व त्यांचे चिरंजीव आयुष यांनी राग देस मधील मत्त तालातील निबध्द अशा अनवट रचना सादर केली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष रचना 'देवभुमी भारत शुभ वंदना' ही रचना राष्ट्राला समर्पीत केली. 'राजा रामचंद्र राघव सितापती पुरूषोत्तम्..' भक्ती रचनेने रसिक भावनिक झाले. या सत्राचा समारोप दृत सुल तालातील रचना 'भारत पुण्यधन- ऋषीमुनी परंपरा' या व्दिवेदी पिता-पुत्रांना पखावजवर आंबेजोगाईच्या पंडित उध्दवराव आपेगावकर यंनी दमदार साथ केली. तर तानपु-यावर प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते मयुर पाटील व विजय पाटील यांनी साथ संगत केली.

तबला पखावज जुगलबंदीची मोहिनी

प्रसिध्द तबला वादक पं. कुमार बोस यांनी मध्यलय तिनताल सादर केला यामध्ये पेशकार, बंदिशी तुकडे पलटे, रेले यांच्या माध्यमातून नादब्रम्हाची अनुभूती दिली त्यांच्या बरोबर शिष्य पखवाज वादक कुणाल पाटील यांनी तितकेच दमदार पखवाज वादन करून रंगत भरली. मिलिंद कुलकर्णी यांनी नगम्याची साथ दिली.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, तसेच संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे बालगंधर्व महोत्सवाला प्रायोजकत्व लाभले असुन आजच्या कार्यक्रमाप्रसंगी जैन इरिगेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ सुधीर भोंगळे, जैन इरिगेशनचे अनिल जोशी, भारतीय जीवन विमा कंपनीचे अरूण जोशी, उद्योजक किरण बेंडाळे, अशोक बागडे, प्रा. शरदचंद्र छापेकर, केशवस्मृतीचे रत्नाकर पाटील यांच्यासह कलावंताची उपस्थिती होती. मैफिलचे सादरीकरण करणाऱ्या कलावंताचे प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. गणेशवंदना मयुर पाटील यांनी सादर केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com