चाळीसगाव येथे राष्ट्रीय एकता दौड

आ. मंगेश चव्हाण यांनी सहभागी होत एकतेच्या शपथीचे सामूहिक वाचन
 चाळीसगाव येथे राष्ट्रीय एकता दौड

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या जयंतीनिमित्त देशभरात साजरा होणार्‍या राष्ट्रीय एकता दिवसच्या औचित्याने चाळीसगाव येथे क्रीडा विभाग, तालुका प्रशासन यांच्या वतीने एकता दौडचे आयोजित एकता दौड मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आमदार मंगेश चव्हाण यांनी या एकता दौड मध्ये सहभागी होऊन क्रीडापटूंचा उत्साह वाढवला. तसेच यानिमित्ताने राष्ट्रीय एकतेची सामूहिक शपथ घेतली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौकापर्यंत एकता दौड करण्यात आली. या दौडमध्ये प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, क्रीडा शिक्षक अजय देशमुख, शरद सूर्यवंशी, राहुल साळुंखे, योगेश साळुंखे, संजय देशमुख, प्रशांत पाटील, आनंदा पवार, श्री चव्हाण सर, श्री जहीर सर, श्री जावळे सर, श्री शिनकर सर, श्री पवार सर, श्री साठे सर, तुषार निकम, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, कुस्तीगीर संघाचे सुनील देशमुख, अक्षय राजपूत, गोरख सुर्यवंशी, श्री निंबाळकर सर, योगेश शिंदे आदी उपस्थित होते. लुधियाना, पंजाब येथे होत असलेल्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ चाळीसगाव येथून रवाना होत आहे, सदर संघात चाळीसगाव येथील ५ स्पर्धक खेळाडू सहभागी होत असून त्यांची देखील आमदार चव्हाण यांनी भेट घेऊन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com