बोदवडच्या नेमाडे हायस्कूलमध्ये रंगला किशोरी मेळावा

बोदवडच्या नेमाडे हायस्कूलमध्ये रंगला किशोरी मेळावा

बोदवड Bodwad प्रतिनिधी:

सर सत्यजित राम नेमाडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (Sir Satyajit Ram Nemade Secondary and Higher Secondary School) बोदवड येथे किशोरी मेळावा (Kishori Melawa) 2022-23 चे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. टी. बडगुजर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक आर. जी. हजारी जेष्ठ शिक्षिका श्रीमती. एम.बी. बरकले तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख एस.पी. मंगळकर उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती. सीमा जोशी यांनी किशोरवयीन अवस्था त्यातील मुलींच्या सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना यावर मुलींशी संवाद साधला कार्यक्रमाला इ. 10 ते 12 या वयोगटातील एकूण 200 मुली हजर होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिशा बोदडे,पुजा चव्हाण या बारावीच्या विद्यार्थिनीनी केले. तर आभार प्रदर्शन कु.वैष्णवी शर्मा या विद्यार्थिनीने केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्य लाभले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com