रावेरात राजीव पाटलांचा देखील माजी आ.अरुण पाटील यांना पाठिंबा

जिल्हा बँक निवडणुकीत माजी आमदार अरुण पाटील यांची यशस्वी खेळी
रावेरात राजीव पाटलांचा देखील माजी आ.अरुण पाटील यांना पाठिंबा

रावेर|प्रतिनिधी raver

माजी आमदार अरुण पाटील यांनी महाविकास आघाडीविरुद्ध उमेदवारी करून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) व काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी (MLA Shirish Chaudhary) यांनी दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात तगडे आव्हान दिले होते.त्यांच्या याआव्हानाने काँग्रेस मध्ये फूट पडून दोन उमेदवार रिंगणात राहिले होते,बंडखोरी झाली म्हणून जनाबाई महाजन यांनी माघार घेऊन अरुण पाटील यांना पाठिंबा दिला होता.

त्यानंतर राजीव पाटील विरुद्ध अरुण पाटील अशी दुरंगी लढत रंगणार असतांना,शुक्रवारी राजीव पाटील यांनी देखील जळगाव येथे पाठिंबा दिला. यावेळी संजय पवार व ज्ञानेश्वर महाजन यांनी यशस्वी मध्यस्थीची भूमिका पार पाडल्याने अरुण पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com