
भुसावळ bhusaval। प्रतिनिधी
गेल्या सहा दिवसांपासून भुसावळ शहराने तापमानात 46 पार केली आहे. अशा या रणरणत्या उन्हात नागरिकांचे जगणे असाह्य झाले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचे भीषण परिणाम दिसून येत आहे. नाशिक येथील रेल्वे कर्मचारी (Railway employee) आजीच्या दशक्रिये विधीनिमित्त आल्याने ऊन सहन (heat stroke) न झाल्याने त्यांचा मृत्यु (dies)झाला.
येथील तुकाराम नगर येथील रहिवासी व नाशिक येथे रेल्वेत कामाला असलेला तरुण निलेश शालिग्राम पाटील हे भुसावळला त्यांच्या आजीच्या दशक्रिया विधीनिमित्त आले होते. मात्र त्यांच्यावर काळाने झडप घातली. काल त्याला अस्वस्थ वाटू लागले कुटुंबियांनी त्यांच्यावर स्थानिक दवाखान्यांमध्ये उपचार केले.
मात्र त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना डॉ.राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले असता त्यांना डॉ.मानवतकर यांनी मृत घोषित केले. नुकतेच 15 दिवसापूर्वी त्यांना कन्यारत्न झाल्यामुळे झेडटीएस येथे गाडगे महाराज मंदिराजवळ मुलीला देखील पाहायला जावून आले. त्यानंतर मात्र भुसावळच्या तीव्र उन्हाने या तरुणाचा बळी घेतला आहे.
अधिकृतरित्या उष्माघाताने बळीची ही भुसावळ शहरातील पहिलीच घटना आहे. मात्र त्यांच्या कुटुंबीयांकडुन निलेश पाटील यांचे हृदयविकाराने मृत्यु झाला असे सांगण्यात येत होते. या घटनेमुळे भुसावळातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील ट्रामा सेंटर येथे निलेश पाटील यांचे शवविच्छेदन करून आज दि.16 रोजी सकाळी भुसावळ येथील तुकाराम नगरातील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे.
मागील आठवड्यापासून शहरासह परिसरातील तापमानाने 45 अंशांचा पारा पार केला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी शहातील रस्ते काही अंशी निर्मनुष्य दिसून येत आहे. तसेच थंड पेयांकडेच नागरिकांचे पाय वळत आहे. नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी पालिका प्रशासने गर्दीच्या ठिकाणांसह ठिकठिकाणी नागरिकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था केली आहे. अशा प्रकारे उष्माघातावर मात करण्यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न होत आहे.
उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान शक्यतोवर घराबाहेर पडू नये. जास्तीत जास्त पाणी प्यावे. उष्माघाताचा त्रास जाणवल्यास वैद्यकिय उपचार घ्यावे, असा वैद्यकिय सल्लाही दिला जात आहे.