राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाड की हप्तावसुली ?

कारवाई न करता पथक माघारी : चर्चेला उधाण
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाड की हप्तावसुली ?
संग्रहित चित्र

सुनसगाव (Sunasgaon) ता भुसावळ - वार्ताहर

येथे व परिसरातील एका गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State exies department) पथकाने सकाळी - सकाळी धाड टाकून कारवाई दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र काही वेळाने (Liquor sellers) दारु विक्रेतेच पोलीस वाहनाच्या आवतीभोवती गोळा होऊ लागल्याचे दिसल्याने (police) पोलीस धाड टाकण्यासाठी आले होते की हप्ता वसुलीसाठी आले होते अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

या बाबत माहिती अशी की, दि १४ रोजी सुनसगाव (Sunasgaon) वाघुर नदीच्या पुलाजवळील (Waghur river pool) विटभट्टी जवळ राज्य उत्पादन शुल्क विभाग मुक्ताईनगर (Muktainagar) यांची एम.एच. १९ एम. ०७७९ क्रमांकाची पोलीस गाडी येऊन थांबली व या गाडीतून कुऱ्हाडी व काठ्या घेऊन पथकातील कर्मचारी नदीकाठ व पाण्याच्या टाकी कडे फिरले मात्र एकही कारवाई झाली नाही. परंतु काही वेळातच दारु विक्रेत्यांची गर्दी पथकाच्या व्हँन जवळ होऊ लागली त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रश्न पडला की पथक गाडी घेऊन कारवाईसाठी आले होते की हप्ता वसूलीसाठी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यानंतर हीच पोलीस व्हँन (Police van) गोजोरे येथे गेली त्यामुळे तिथे काय कारवाई करण्यात आली याबत कोणीही सांगायला तयार नाही.

Related Stories

No stories found.