अयोध्यानगरात भाड्याच्या घरात कुंटणखान्यावर छापा

दोन दलासह एक महिला ताब्यात ; पोलिस उपअधीक्षकांची कारवाई
अयोध्यानगरात भाड्याच्या घरात कुंटणखान्यावर छापा

जळगाव jalgaon

शहरातील अयोध्यानगरमध्ये (Ayodhya Nager) भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या कुटंनखान्यावर (At the brothel) पोलिस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) व एमआयडीसी पोलिसांच्या (MIDC Policed) पथकाने गुरुवारी रात्री ८ वाजता छापा (raid) मारला. या ठिकाणाहुन अमोन आदिनाथ दारकुंडे (Amon Adinath Darkunde) (वय २९, रा. क्रांतीचौक, शिवाजीनगर) व प्रशांत रतन जैन (Prashant Ratan Jain)(वय ३१, रा. अयोध्यानगर, अजिंठा हौसिंग सोसायटी या दोन दलालांसह एका महिलेला ताब्यात (possession) घेण्यात आले. तर तीन पिडीत महिलांची सुटका (Three victim women rescued) करण्यात आली.

अयोध्यानगरातील दिलीपसिंग रामलालसिंग परदेशी यांच्या घरात महिला भाड्याने राहत होती. महिलेने या घरात कुटंुनखाना सुरू केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफार तडवी, सुनिल सोनार, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, नीलेश पाटील, महेश महाले, रवींद्र मोतीराया यांच्या पथकाने एक बनावट ग्राहकाच्या माध्यमातून कुंटनखान्यात प्रवेश केला. यावेळी तेथे तीन पिडीत महिला मिळुन आल्या. त्यांची सुटका करण्यात आली. तर एका महिलेस दोन दलालांना ताब्यात घेऊन कारवाई केली. सपना एरगंुटला यांच्या फिर्यादीवरुन तीघांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.