जळगावातील तांबापुरा, मासूमवाडीत राडा

रात्रभर धरपकड मोहीम, पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
जळगावातील तांबापुरा, मासूमवाडीत राडा

जळगाव । Jalgaon

किरकोळ भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होवून तुफान दगडफेक झाल्याची घटना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील तंबापुरातील (Tambapura) गवळीवाड्यात (Gawaliwada) घडली. यात एक महिला जखमी झाली आहे. तसेच याचवेळी मासुमवाडीत दोन गटात हाणामारी झाली, यात एक तरुण जखमी झाला असून त्यांना जिल्हा रूग्णालयात (district hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनांमुळे दोघ ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरातील तांबापुरा (Tambapura) परिसरातील गवळीवाडा (Gawaliwada) येथील मच्छीबाजार समोर मंगळवार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोन जणांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून दोघांनी आपल्या गटातील तरूणांना बोलावून घेतले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने हाणामारी होवून तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये स्थानिक रहिवाश्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. तर या दगडफेकीत एक महिला जखमी झाले आहे. जखमी महिलेला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (District Government Medical College) उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

गवळीवाड्यात दगडफेक झाल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे (MIDC Police Station) पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेवून परिस्थिती आटोक्यात आणली. याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दगडफेकीत दगड, विटासह काचेच्या बाटल्यांचा वापर

दगडफेकीत दोघी गटाकडून फरशी, विटा यासह दारूच्या व सोड्याच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. याठिकाणी अनेक भंगार व्यावसायिक असल्याने त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात काचेच्या बाटल्या असतात त्यांचा वापर अशा पद्धतीने होत असल्याचे अनेकवेळा झालेल्या दंगलीतून समोर आले आहे.

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी धाव

घटनास्थळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे (Superintendent of Police Dr. Pravin Mundhe), अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे (Police Inspector Pratap Shikare) हे घटनास्थळी दाखल झाले होते.

रात्रभर धरपकड मोहीम

घटना घडल्यानंतर शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत संशयिताना ताब्यात घेण्याची मोहीम सुरू होती.

जुन्या वादातून मासूमवाडीत दोन गट भिडले

तीन-चार दिवसापूर्वी गोळ्याच्या गाडीवरून झालेल्या वादातून आज पुन्हा दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना साडेनऊ वाजता मासूमवाडीत घडली. यात जावेद खान नाजीमोउद्दीन खान रा. मासूमवाडी हा तरुण जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com