बंडखोर नगरसेवकांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह ?

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महापालिकेत चार वर्षापूर्वी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर दोन वर्षापुर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी (rebel corporators) करुन शिवसेनेसोबत मनपात सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर पुन्हा भाजपच्या दोन नगरसेवकांना सोबत घेवून 29 बंडखोर नगरसेवकांनी बैठक घेवून अ‍ॅड. दिलीप पोकळे यांना भाजप गटनेता म्हणून निवड केली व आम्हीच भाजप (bjp) असल्याचा दावा विभागीय आयुक्तांकडे केला आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांपेक्षा जास्त नगरसेवक बंडखोर गटाकडे आहे. परंतु या बंडखोर गटातील नगरसेवक शिंदे गटात (Shinde group) गेले आहे. त्यामुळे नेमके बंडखोर नगरसेवक कोणाकडे असा प्रश्न पडला आहे. तर विभागीय आयुक्तांनी जर निर्णय दिल्यास भाजपची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Jalgaon Municipal Corporation
मित्रच झाला मित्राचा वैरी, चॉपरने सपासप वार करी
Jalgaon Municipal Corporation
Makeup Part 4 # असा करा Self makeup
Jalgaon Municipal Corporation
गुलाबरावांच्या राजीनाम्यावर आज होणार निर्णय ?

राज्यात शिवसेना कोणाची यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेवून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तसेच शिंदे यांनी आम्हीच मुळ शिवसेना असल्याचा दावा केला होता. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांच्याकडे जास्त आमदार असल्यामुळे शिवसेना चिन्ह व नाव हे शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

Jalgaon Municipal Corporation
Breaking# मित्रावर हल्ल्याची भिती, न्यायालयात चॉपरची सोबती
Jalgaon Municipal Corporation
Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप
Jalgaon Municipal Corporation
पोलिसाची पत्नीला क्रूर वागणूक, सासरच्यांविरोधात तक्रार झाली दाखल

असाच प्रकार जळगाव महापालिकेत देखील घडलेला असून भाजपच्या 29 नगरसेवकांनी वेगळा गट करून अ‍ॅड. दिलीप पोकळे यांना गटनेता निवडला आहे. तसेच त्यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे आम्हीच भाजप पक्षाचे नगरसेवक दावा केला असून उर्वरीत भाजपच्या 27 नगरसेवकांना अपात्र करण्याची याचिका केली आहे.

Jalgaon Municipal Corporation
जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कॉप्यांचा सुळसुळाट!
Jalgaon Municipal Corporation
फरार अरुण गवळी अखेर गजाआड

केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत दिलेला निर्णय जळगाव मनपाला लागू झाल्यास बंडखोर गटाचे नगरसेवक मुळ भाजप पक्ष समजला गेल्यास नवल वाटायला नको,अशी चर्चा होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com