पोलीस भरतीतील उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर

पोलीस भरतीतील उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा पोलीस दलातर्फे (District Police Force) रिक्त 128 पोलीस शिपाई (post of Police Peon)पदासाठी भरती (Recruitment) प्रक्रिया सुरु आहे. याअंतर्गत अर्ज करणार्‍या उमेदवारांची लेखी परीक्षा पार पडली होती. या लेखी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून गुणवत्ता यादी (Quality list) जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर (Website) जाहीर करण्यात आली आहे. तसेच लेखी परीक्षेच्या आधारावर पात्र उमेदवारांची 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान जळगाव शहरातील पोलीस मैदानावर शारिरीक चाचणी तसेच कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे (District Superintendent of Police Dr. Pravin Mundhe) यांनी दिली आहे.

पोलीस शिपाई पदासाठी 21 हजार 690 उमेदवारांची लेखी परीक्षा दिली होती. उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावर उमेदवारांनी घेतलेल्या हरकती निकालात काढण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा निर्णयही पोलीस दलाच्या संकेतस्थळावर 1 नोव्हेंबर रोजी प्रध्दिी करण्यात आला आहे. लेखी परीक्षेच्या आधारावर शारिरीक चाचणी व कागदपत्र पडताळणी 1ः10 याप्रमाणे उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची पोलीस मैदानावर शारिरीक व कागदपत्र पडताळणी होणार आहे. यात पुरूष उमेदवारांची 9 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर तर 11 नोव्हेंबर रोजी महिला उमेदवार व माजी सैनिक पुरूष उमेदवारांचे शारिरीक मोजमाप, मैदानी चाचणी तसेच कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे.

दिनांक निहाय यादी पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असून सर्व पात्र उमेदवारांनी वेळापत्रकाप्रमाणे नेमून दिलेल्या दिनाकांस सकाळी 6 वाजता पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे उपस्थित राहणे बंधनकारण आहे. विहित कालावधीत उपस्थित नसलेल्या उमेदवारास अन्य दिवशी संधी दिली जाणार नाही. भरतीसाठी कुणीही पैशांची मागणी केल्यास तक्रार करावी. आमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये असे आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com