वाळू चोरट्यांकडून तलाठ्यास धक्काबुक्की

चाळीसगाव ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल
वाळू चोरट्यांकडून तलाठ्यास धक्काबुक्की

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील रांजणगांव येथे रात्रीच्या वेळी वाळुची चोरटी वाहतूक (Sand smuggling) करणार्‍या ट्रक्टरला (tractor) अडवल्याच्या कारणावरुन तलाठ्याला धक्काबुक्की करीत ट्रॅक्टर पळवून नेण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तलाठी (Talathi) विनोद मेन यांच्या तक्रारीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलाठी (Talathi) विनोद कृष्णराव मेन हे कोतवाल ऋषीकेश सुर्यवंशी आणि वाहन चालक सुरेश जाधव यांच्यासह वाळुचोरीबाबत गस्तीवर असतांना पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारांस त्यांनी वाळूने भरलेले महेंद्र कंपनीचे ट्रॅक्टर अडवले असता ट्रॅक्टरवरील अक्षय धनंजय सुर्यवंशी (वय २०) याने तलाठी मेन यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली व ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी तलाठी मेन यांनी पोलीसांत धाव घेतली. चाळीगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.