पूर्णपात्रे विद्यालयाच्या वृक्षदिंडीने वेधले शहराचे लक्ष

विठ्ठु नामाचा गजर करत बाळगोपाळ वारकर्‍यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश
पूर्णपात्रे विद्यालयाच्या वृक्षदिंडीने वेधले शहराचे लक्ष

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

आषाढी एकदशी (Ashadhi Ekadashi) निमित्ताने शहरातील डॉ.सौै.प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालयातर्फे (Dr. Saui. Pramilatai Purnapatre Primary School) दि,९ रोजी पर्यावरण संरक्षणासाठी (environmental protection) वृक्षदिंडी (vr̥kṣa diṇḍi) काढण्यात आली होती. दिडींत वारकरी वेषभूषेतील (Warakari in costume) बाळगोपाळ विद्यार्थ्यांनी विठ्ठल..विठ्ठल.. जय हरी विठ्ठलचा गजर करत शहराचे लक्ष वेधून घेतले.

शिशुविहार शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यजित पूर्णपात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सचिव डॉ.सौ.शुभांगी पूर्णपात्रे यांच्या हस्ते बाळगोपाळाच्या हातात वारकरी संप्रदायाचा भगवा झेंडा देवून दिंडीचा शुभारंभ करण्यात आला.

दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकर्‍यांची वेधभूषा धारण केली होती. टाळ, मुदूंगाच्या गजरात दिडीला सुरुवात शाळेतून झाली, पुढे नेताजी चौक, वीरसावरक चौक, भडगांव रोड, गवळीवाडा मार्ग दिंडीची सांगता शाळेत झाली. रस्त्यात दिडींचे ठिकठिकाणी लोकांची स्वागत केले. दिंडीचे नियोजन मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांच्यासह सहकार्यांनी केले.

याप्रसंगी पराग सानप, राजेंद्र चौधरी, राजेंद्र वराडे, आनंद जगताप, राकेश चित्ते, देवेंद्र दाभाडे, लता निकम, रेणूका पाटील, मोनाली पाटील, मनिषा पाटील, सुनिता ठोके, सचिन पाटील, नेहा पाटील, सविता पाटील, मेघा शिंदे, जयश्री मोरे, सरला देवरे, एम.एम.पाटील, सागर पवार, रुपाली बोरसे, रुपाली कुमावत, रोशनी सांळुखे, वैशाली पाटील, उदय देशपांडे, उदय जोशी, सुरेश काटकर, योगेश सांळुखे यांच्यासह शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com