बोदवड पोलिस हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात

बोदवड पोलिस हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात

बोदवड / Bodwad प्रतिनिधी :

खंडणीच्या गुन्ह्यात (crime of extortion) मदत करण्यासह चॅप्टर केस एलसीबीऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी 20 हजारांची लाच (bribe) मागून तडजोडीअंती 16  हजारांची लाच स्वीकारणार्‍या पंटरासह बोदवडमधील हवालदारास (constable) जळगाव एसीबीच्या पथकाने (Jalgaon ACB team)अटक (arrested) केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारात हा सापळा यशस्वी करण्यात आला. हवालदार वसंत नामदेव निकम व खाजगी पंटर एकनाथ कृष्णा बाविस्कर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

बोदवड पोलिस हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात
अरे व्वा जळगाव जिल्ह्यात 31 जातीच्या पक्षांचा रहीवास
बोदवड पोलिस हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात
आपल्या टिव्ही चॅनल्सची ही दरवाढ पाहीली का ?
बोदवड पोलिस हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात
फेब्रुवारीतच जळगाव झाले हॉट : पारा 36 अंशावर

असे आहे लाच प्रकरण

बोदवडमधील तक्रारदारासह त्याच्या तीन मित्रांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यात सी फायनल न्यायालयात पाठवण्यासाठी तपासाधिकारी असलेल्या हवालदार वसंत निकम यांनी प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे 20 हजारांची लाच मागितली होती मात्र चार हजार प्रत्येकी देण्याचे ठरल्यानंतर एसीबीकडे तक्रार करण्यात आली.

शनिवारी सकाळी 11.30 वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात निकम यांनी पंटर बाविस्कर याच्याकडे लाच रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पंटराने लाच स्वीकारताच हवालदाराला अटक करण्यात आली. 

जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

बोदवड पोलिस हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात
महिला प्रवाशांशी अरेरावी, रावेरला चालक निलंबित
बोदवड पोलिस हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात
सावधान : सौदर्यप्रसाधने घेताय... तर ही बातमी महिला व ब्युटीपार्लर चालकांनी वाचलीच पाहीजे
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com