लोड कमी करण्यासाठी 10 हजारांची लाच मागणारा पंटर गजाआड

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; गुन्हा दाखल
लोड कमी करण्यासाठी 10 हजारांची लाच मागणारा पंटर गजाआड

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

बिलामध्ये सॅक्शन (Section in Bill) असलेला लोड 26 केव्हीवरुन तो 18 केव्हीपर्यंतची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणचे (Mahavitran) एमआयडीसी विभागातील अभियंता पाचंगे यांच्याकडून करुन देतो. असे सांगून दहा हजाराची मागणी (Demand for ten thousand) करणार्‍या अनिल सुधाकर सासनीक (वय-35, रा. प्लॉट नं.7, श्रद्धाकॉलनी महाबळ) याच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-corruption department action) कारवाई केली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

Anti Corruption Bureau
Anti Corruption Bureau

शहरातील एमआयडीसी परिसरात तक्रादाराचा साई सर्व्हिसिंग नावाने कार रिपेअरींगचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे मीटर हे कमर्शियल असून त्यावर 26 केव्ही लोड सॅक्शन असे असतांना वीज बिलात लोड 2 केव्ही असा नमूद आहे.

याठिकाणी एमईसीबी विभागाचे व्हिजीलन्सने तपासणी केली होती. तेव्हापासून तक्रादाराला वाढीव वीजबिल मिळत होते. तसेच बिलामध्ये सॅक्शन लोड 26 केव्ही ऐवजी तो 18 केव्ही करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार खासगी पंटर अनिल सुधाकर सासनीक याने लोड दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरला.

तसेच तक्रादाराला दरमहा येणारे वीजबिलामध्ये वीजलोड दुरुस्त करुन महावितरणचे एमआयडीसी विभागाचे अभियंते श्री. पाचंगे यांच्याकडून काम करुन देतो यासाठी दहा हजारांची लाच मागितली होती.

अभियंत्याच्या नावाने मागितली लाच

महावितरणचे अभियंता श्री. पाचंगे यांच्या नावाने खासगी पंटर अनिल सासनीक याने दहा हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने संबंधित पंटरची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. पथकाने सापळा रचून लाच मागणार्‍या अनिल सासनीक याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन. जाधव, सफौ दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहिरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, महिला पोलीस कर्मचारी शैला धनगर, जनार्दन चौधरी, सुनिल शिरसाठ, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळू मराठे, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी, सचिन चाटे, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com