पाचोरा येथे पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेसला थांबा मिळण्यासाठी आंदोलन

पाचोरा येथे पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेसला थांबा मिळण्यासाठी आंदोलन

पाचोरा - प्रतिनिधी pachora

कोरोना (corona) काळात विस्कळीत झालेल्या रेल्वे वेळापत्रकाने (Railway timetable) पाचोरा-भडगाव-जामनेर-सोयगाव-एरंडोल या तालुक्यातील नागरिकांना व प्रवाशांना त्रास होत आहे. विद्यार्थी व्यापारी नोकरदार गोरगरीब जनता यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. त्यामुळे पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समिती लोक भावना लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनात जाग आणण्यासाठी आंदोलनाच्या पवित्रा घ्यावा लागत आहे.

संध्याकाळी सात वाजेनंतर पाचोरा येथून मुंबईला (mumbai) जाण्यासाठी कोणतीच गाडी नसल्याने विदर्भ एक्सप्रेस व पंजाब मेल (Vidarbha Express and Punjab Mail) या गाड्यांना पाचोरा येथे थांबा तसेच भुसावळ मुंबई पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी पाचोरा रेल्वे स्टेशन येथे पाचोरा प्रवासी रेल्वे कृती समितीतर्फे दि.२० ऑक्टोबर२०२२ गुरुवार रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

सदर मागण्यासाठी रेल्वे प्रशासनाला कृती समितीतर्फे अनेक निवेदन दिले आहेत परंतु रेल्वे प्रशासन त्याची दखल घ्यायला तयार नाही. वरील मागण्यासाठी पाचोरा प्रवासी कृती समितीतर्फे धरणे आंदोलन केले जाणार आहे.

या आंदोलनात विद्यार्थी व्यापारी प्रवासी रिक्षा युनियन व गोरगरीब जनता सहभागी होणार आहे तरी या आंदोलनात समविचारी लोकांनी आंदोलन सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख, व्ही टी जोशी, ॲड.अविनाश भालेराव, भरत खंडेलवाल, सुनील शिंदे, नंदकुमार सोनार, ॲड.अण्णा भोईटे, पप्पू राजपूत,, शेबाज बागवान, गणेश पाटील, संजय जडे, बंडू मोरे, अनिल येवले, यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com