पारोळा शहरात 289 वाहनांवर दंडात्मक कारवाई

पारोळा शहरात 289 वाहनांवर दंडात्मक कारवाई

पारोळा - parola

शहरात रस्त्यावर टू व्हीलर, थ्री व्हीलर व फोर व्हीलर वाहने (Two wheeler, three wheeler and four wheeler vehicles) रस्त्यावर लावणे, तसेच कारण नसतांना रोडवर वाहने उभी करून ठेवणे, नो पार्किंग (No parking) मध्ये लावणारे वाहणे तसेच विना नंबर प्लेट, ट्रिपल सीट, कागदपत्र जवळ न बाळगणे अशा वाहन चालकविरुद्ध 1 मे ते 26 मे 2022 पर्यंत पोलीस निरीक्षक रामदास वाकोडेयांचे मार्गदर्शनाखाली पो हे कॉ सत्यवान पवार, पो कॉ दीपक अहिरे यांनी मोटर व्हेहिकल ॲक्ट प्रमाणे केसेस करून 1,73,900 रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

यात असे निदर्शनास आले की मोटर सायकल चालविणारे हे त्यांची मोटर सायकल रस्त्यावरच वाहतुकीस अडथडा निर्माण होईल अशा परिस्थितीत लावतात त्यामुळे वाहतुकीस अडथडा निर्माण होतो आशा परिस्थितीत वाहने लावणारे लोकांवर मोटर व्हेहिकल ऍक्ट प्रमाणे मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे,त्यामुळे वाहन चालकांनी रस्त्याच्या बाजूला वाहन लावावे,वाहतुकीस अडथडा होणार नाही याची प्रत्येक वाहन चालकाने काळजी घेतली पाहिजे.

तसेच भाजीपाला विकणारे लोटगाडी वाले,भाजीपाला विकणारे शॉप वाले सुद्धा रस्त्यावर भाजीपाला विकण्यास पुढे पुढे येतात असे एकूण 12 भाजीपाला विकाणारावर मुंबई पोलीस कायदा अनव्ये कारवाई करण्यात आली असून मा पारोळा न्यायालयात नमूद प्रकरणे दाखल केले आहेत त्यामुळे भाजीपाला व इतर वस्तू वाहतुकीस अडथडा निर्माण होईल अशा परिस्थितीत विकू नये अन्यथा यापुढे (mumbai police) मुंबई पोलीस कायदा प्रमाणे कारवाई होणार आहे त्यामुळे रस्त्यावर कोणीही अडथडा निर्माण करू नये असे आवाहन पोलिसांनी केलेले आहे, सर्व जनतेने पोलिसांना सहकार्य करावे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com