तलाठ्याच्या अंगावर डंपर घालणार्‍या चालकासह मालकाला शिक्षा

शिक्षा
शिक्षा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

अवैधरित्या वाळू वाहतूक करून मंडळ अधिका-याची कॉलर पकडत तलाठीच्या अंगावर डंपर (dumper)घालणार्‍या संजय आसाराम कोळी (वय- 30, रा. वडगाव सोनतो, ता. जामनेर) व धनंजय जनार्दन कोळी (वय-18, रा. नेरी, ता. जामनेर) या डंपरमालकासह (owner) चालकाला (driver)सोमवारी जिल्हा न्यायालय-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधी सु.श्री.सापटणेकर सक्तमुजरीसह दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली आहे.

शहरातील मोहाडी रस्त्यावर दि. 5 एप्रिल 2015 रोजी मंडळ अधिकारी राहुल नाईक, तलाठी झी.डी.लांबोळे व तलाठी आर.टी.वंजारी, के.एम.बागुल यांच्या पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले होते. तहसिल कार्यालयात डंपर नेण्यास सांगितल्यावर चालक संजय कोळी याने राहुल नाईक यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली होती. तर धनंजय कोळी याने डंपर सुरू करून तलाठ्यांच्या अंगावर घातला होता. दरम्यान, याप्रकरणी नाईक यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. हा खटला जिल्हा न्यायालय-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधी सु.श्री.सापटणेकर यांच्या न्यायालयात सुरू होता. यात सरकारपक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्क्षी, पंच, पोलिस पाटील, तपासी अधिकारी तसेच फिर्यादी यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. साक्षीपुराव्याअंती सोमवारी न्यायालयाने संजय कोळी व धनंजय कोळी यांना दोषी धरून शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुनीलकुमार चोरडीया यांनी कामकाज पाहिले.

अशी सुनावली शिक्षा

आरोपी संजय कोळी याला भादंवि कलम 353 नुसार 1 वर्ष सक्तमजुरी, 5 हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याची साधी कैदेची शिक्षा तर भादंवि कलम 379 नुसार 1 वर्ष सक्तमजुरी, 5 हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याची साधी कैद व भादंवि कलम 506 नुसार 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.आरोपी धनंजय कोळी याला भादंवि कलम 307 नुसार 4 वर्ष सक्तमजुरी, 10 हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याची साधी कैद तसेच भादंवि कलम 506 नुसार 1 वर्षाची शिक्षा तर भादंवि कलम 353 नुसार 1 वर्ष सक्तमजुरी, 5 हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याची साधी कैद आणि भादंवि कलम 379 नुसार 1 वर्ष सक्तमजुरी, 5 हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com