पाडळसरेत देव खोपडीत ठेवून पूजन

लहान बालकांचे पूजनाने खरीप व रब्बी हंगामातील मालाचा काढला जातो भाव
पाडळसरेत देव खोपडीत ठेवून पूजन

 अमळनेर Amalner प्रतिनिधी 

कार्तीकी एकादशीला (Kartiki Ekadashi) पूर्ण गावात पालखी सोहळ्याची (Palkhi ceremony) मिरवणूक (Procession)काढून उसाची किंवा ज्वारी चिकणी आदींची पांच तोट्याची खोपडी (God in the skull) तयार करून चौकाचौकात देव्हाऱ्यात असलेल्या देवांची पूजा करून (Worship of Gods) खरीप व रब्बी हंगामातील (Kharif and Rabi season) मालाचे भाव (Price of goods) लहान मुलांना बसवून पूजन करून काढण्याची पुर्वी पार परंपरा कायम (Tradition continues) असून यावर्षी केळी कापूस व तुरीला चांगला भाव मिळेल असा अंदाज आज वर्तविण्यात आला.

पाडळसरेत देव खोपडीत ठेवून पूजन
Photos # संतनगरीत उसळली भक्तांची गर्दी

खोपडीत देवपूजन झाल्यावर गावातील विवाह सोहळा करण्यास सुरुवात करण्यात येत ही पारंपरिक पद्धत आजही तशीच चालत आलेली आहे ती कायम आहे.

जेष्ठ नागरिक दिलीपचंद गंभीर गुर्जर यांच्या चौकात पुजेसाठी तयार केलेल्या खोपडीत कार्तिकी देवषयनी एकादशी निमित्ताने राम शाम या दोन्ही भावांची खोपडीत बसवून पूजा करण्यात आल्यावर देव्हाऱ्यातील देवांची व खोपडीत ठेवून खोपडीसह पूजा करण्यात आली. यावेळी गल्ली गल्लीत देव खोपडी पूजन झाल्यावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी , संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पादुका व गीता रामायण ग्रंथाची पालखी सोहळ्याची मिरवणुकीत घराघरातुन आरती झाली व प्रसाद वाटप करण्यात आला. पालखी सोहळ्याची मिरवणुकीत संत तुकाराम महाराज भजनी मंडळ व ग्रामस्थांनी सहभागी होत मिरवणूक यशस्वी केली.

पाडळसरेत देव खोपडीत ठेवून पूजन
विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवीसाठी विलंबशुल्कासह १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com