पब्जीच्या नादात महाविद्यालयीन तरूणीने गमावला जीव

जामनेर येथील हृदयद्रावक घटना
पब्जीच्या नादात महाविद्यालयीन 
तरूणीने गमावला जीव

जामनेर Jamner / प्रतिनिधी

जामनेर येथील बारावी शाखेमध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने (young woman) पब्जी खेळाच्या (Pubji game) नादात स्वतः आत्महत्या (Suicide) केली. तशी सुसाईड नोट(Suicide note) या मुलीने लिहून ठेवली आहे .

याबाबत मिळालेली माहिती अशी की कुमारी नम्रता पद्माकर खोडके [मूळ राहणार भराडी] हल्ली मुक्काम जामनेर या 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या वीस वर्षीय तरुणीने आज पब्जी खेळाच्या नादात एका स्टेपवर आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. नम्रता चे वडील हे स्थानिक डॉक्टरांकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम पाहतात .तरुण मुलगी गेल्यामुळे आई-वडिलांवर आभाळ कोसळले . वडील हे डॉक्टर के. एम .जैन यांच्याकडे सहाय्यक म्हणून कार्य करतात . त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून आई वाकी रोडवर घरावर पाणी मारायला गेल्या , त्या वेळेला मुलीने ही कृत्य केले. पब्जी गेम हरल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. फाशी घेण्यापूर्वी नम्रताने सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

या घटनेच्या पाठोपाठ तालुक्यातील बेटावद बुद्रुक येथील रवींद्र रमेश ठाकरे वय 30 या अविवाहित तरुणाने सायंकाळी पाच वाजून 45 मिनिटांनी राहते घरांमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल जयसिंग राठोड, सचिन पाटील, अमोल वंजारी हे करीत आहे.

दरम्यान बेटावद बुद्रुक येथील रवींद्र रमेश ठाकरे वय 30 या अविवाहित तरुणाने आज सायंकाळी राहत्या घरात फाशी घेतली याच बरोबर वाकी येथील अरुण रमेश चव्हाण वय 36 या विवाहित करुणा ने देखील राहते घरातच फाशी घेतली

याच बरोबर तालुक्यातील वाकी येथील अरुण रमेश चव्हाण या 36 वर्षीय विवाहित युवकाने देखील आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा श्वास थोड्या प्रमाणावर सुरू असल्याचे त्याला उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आणण्यात आले. तेथून त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले होते. अरुण चव्हाण यास दोन मुली व एक मुलगा पत्नी असा परिवार आहे. अरुण हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तालुक्यात एकाच दिवशी तीन जणांनी फाशी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या तिघे घटनेमुळे जामनेर तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.