विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून द्यावयाच्या सदस्यांसाठी तात्पुरती मतदार यादी प्रसिध्द

कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

जळगाव jalgaon प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhary Uttar Maharashtra University) अधिसभेवर निवडून द्यावयाच्या सदस्यांसाठी (members) प्राचार्य, अध्यापक, विद्यापीठ अध्यापक गटाची तसेच विद्यापरिषदेवर (academic council) व अभ्यासमंडळावर (study board) निवडून (elected)द्यावयाच्या सदस्यांसाठी (members) अध्यापक व विभागप्रमुखांची (Teachers and department heads) तात्पुरती निर्वाचक गणाची (Provisional Electoral Roll) यादी (तात्पुरती मतदार यादी) विद्यापीठाने दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रसिध्द (Published) केली असून याबाबतीत काही दुरूस्ती, आक्षेप/हरकती असतील तर ते नोंदविण्यासाठी २१ नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
Accident# भरधाव डंपरने विद्यार्थिनीला चिरडले

   विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. प्राचार्यांमधून अधिसभेवर १०, संलग्नित महाविद्यालये व परिसंस्थामधील अध्यापकांच्या गटांमधून अधिसभेवर १० आणि विद्यापीठ अध्यापकांच्या गटांमधून ०३ सदस्य निवडून द्यावयाचे आहे. याशिवाय संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या विभागप्रमुखांच्या गटामधून अभ्यासमंडळावर ०३ विभागप्रमुख निवडून द्यावयाचे आहेत.

तर विद्यापीठ अध्यापक गटांमधून तसेच महाविद्यालये व परिसंस्थांच्या अध्यापक गटामधून प्रत्येक विद्याशाखेनिहाय प्रत्येकी ०२ सदस्य विद्यापरिषदेवर निवडून द्यावयाचे आहेत. या बाबतीत निर्वाचक गण तयार करण्यासाठी विद्यापीठाकडून यापूर्वीच अधिसूचना जारी करण्यात आली होती. 

            या अनुषंगाने विद्यापीठाने तात्पुरती निर्वाचक गणांची यादी (तात्पुरती मतदार यादी) मंगळवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील नोटीस बोर्डावर प्रसिध्द केली आहे. संबंधितांनी या यादीचे अवलोकन करून आपल्या नावासमोर काही दुरुस्ती /बदल किंवा काही हरकत /आक्षेप असल्यास त्यासंदर्भात आपला लेखी अर्ज आवश्यक त्या पूरक कागदपत्रांसह दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या निवडणूक शाखेत (कक्ष क्रमांक ४१०) प्रत्यक्ष सादर करावा.

कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

विहित तारीख वेळेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी असे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी कळविले आहे.  

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com