लालपरीला दुग्धाभिषेक घालून राज्य शासनाचा निषेध

घोषणाबाजी करत एस.टी. कामगारांचे आंदोलन
लालपरीला दुग्धाभिषेक घालून राज्य शासनाचा निषेध

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

एस.टी. विभागाला (S.T. Department) राज्य शासनात (State Government) विलीनीकरण्यासह (Mergers) विविध मागण्यांसाठी जळगाव आगारातील (Jalgaon depot) एस.टी.कामगारांनी (ST workers) बंद (oscillation) पुकारला आहे. या आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी रोजी जळगाव आगारात एस.टी. कामगारांनी लालपरीचा एस.टी.चा दुग्धाभिषेक (Milk anointing) करत राज्य शासनाचा निषेध (Prohibition) व्यक्त केला.

राज्यभरात एस.टी. कर्मचार्‍यांतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरु आहे. संघटनाविहरीत आंदोलन असून कर्मचारी स्वयंस्फूर्तीने या आंदोलनात सहभागी झाले आहे. सोमवारी जळगाव बस आगारात 1 हजारहून अधिक कर्मचार्‍यांनी ठिय्या आंदोलन केेले होते. मंगळवारी आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी जळगाव आगारातील प्रवेशव्दाराजवळ असलेल्या प्रतिकात्मक असलेल्या एस.टी. बसला दुग्धाभिषेक करत अनोखे आंदोलन करण्यात आले व राज्यशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. बसला हार घालून तिचे पूजनही करण्यात करण्यात आले. यावेळी एस.टी. चे महिला तसेच पुरूष कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. कर्मचार्‍यांच्या कामबंद आंदोलनामुळे बस सेवा ठप्प झाली आहे. ऐन सणासुदीतील या आंदोलनामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. तर आंदोलनामुळे साडेचारशेहून अधिक बसेस एकाच जागी उभ्या असल्याने एस.टी. विभागाचे मोठ्या स्वरुपात आर्थिक नुकसान होते आहे. कुंभकर्णी झोपेत असलेल्या राज्य शासनाला जाग येण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी एस.टी. कर्मचार्‍यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com