स्थानिक गुन्हे शाखेचे बकाले विरुद्ध रावेरात मराठा समाजाकडून निषेध

स्थानिक गुन्हे शाखेचे बकाले विरुद्ध रावेरात मराठा समाजाकडून निषेध

रावेर Raver|प्रतिनिधी-

एलसीबीचे पीआय (PI of LCB) किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल (Maratha community) केलेल्या वादग्रस्त विधानाने (controversial statement) मराठा समाज आक्रमक (Maratha society aggressive) झाला आहे. गुरुवारी रावेरात मराठा समाजाच्या नेत्यांनी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला (Tehsil Office and Police Station) निवेदन (statement) देत तीव्र स्वरूपाचा निषेध (protest registered) नोंदवला आहे.यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष (District President of Prahar Association) सुरेश पाटील (Suresh Patil, यांनी अर्धनग्न होत,बकालेवर गंभीर स्वरूपाची कारवाई (action) व्हावी अशी मागणी केली आहे.

तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना याबाबत निवेदन देण्यात आले,व रावेर पोलीस स्टेशन येथे सपोनि शितलकुमार नाईक यांनी निवेदन स्वीकारले,यावेळी राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष सोपान पाटील,काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी,छावा संघटनेचे अध्यक्ष सुनील महाजन,राष्ट्रवादी,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील,प्रशांत पाटील,घनश्याम पाटील,विनोद चौधरी, किशोर पाटील,गणेश चौधरी, राजेंद्र पाटील, योगेश महाजन, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील व समाज बांधव उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com