हिवाळ्यात असे करा तुमच्या त्वचेचे रक्षण !

 हिवाळ्यात असे करा तुमच्या त्वचेचे रक्षण !

कोणताही ऋतू असो मेकअप हा केलाच जातो. किंबहूना ती एक जीवन शैलीच बनली आहे. ऋतूमानानुसार मेकअपमध्येही बदल होत असतो. हिवाळ्यातील मेकअप सामान्यत: ठळक केला जातो. तसेच त्वचेला मुलायम व स्निग्ध ठेवण्यावर आणि थंडीपासून सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. हिवाळ्यातील मेकअपच्या काही मुख्य घटकांमध्ये हे समाविष्ट आहे.

हिवाळा जरी एक सुंदर ऋतू असला तरी गोठवणारे तापमान आणि कोरडया हवे मुळे आपली त्वचा निस्तेज दिसायला लागते. कमी सूर्यप्रकाश आणि थंड हवामानामुळे शरीरात अधिक तेल निर्माण होणे हि नैसर्गिक बाब आहे. तेव्हा हिवाळ्यात आपल्याला चेहऱ्या सोबत संपूर्ण त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे अत्यावश्यक असते. हिवाळा संपेपर्यंत आपली त्वचा चमकदार, तेजस्वी आणि आनंदी ठेवण्यासाठी खालील आश्चर्यकारक ७ टिप्स फॉलो करा.

01. ऋतू नुसार स्किनकेअर उत्पादने वापरा:

त्वचेची काळजी ऋतू नुसार बदललीच पाहिजे. वातावरण बदलत असताना त्वचा तुमच्याकडून अधिक अपेक्षा करू शकते. त्यानुसार खाण्याच्या पथ्या सोबत विटामिन ई युक्त मॉइश्चरायझर आणि क्लीन्सर वापरणे गरजेचे असते. उन्हाळ्यात तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी काम करणारी उत्पादने हिवाळ्यात काम करू शकत नाहीत. परिणामी, महागडी स्किनकेअर उत्पादने वापरून देखील हिवाळ्यातील आपली त्वचा निस्तेज दिसते. त्यासाठी आपल्याला सौम्य स्किनकेअर उत्पादने वापरणे योग्य ठरते. जो तुमच्या त्वचेचा संरक्षणात्मक नैसर्गिक ओलावा टिकवून तेजस्वी दिसण्यास मदत करतो.

02. हिवाळ्यात देखील सनस्क्रीन वापरा:

हिवाळ्यात उबदार सूर्यकिरण हवी-हवीशी वाटत असली तरी, युव्ही किरण तुमच्या त्वचेचे नुकसान करू शकतात. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे कि सनस्क्रीन हे फक्त उन्हाळ्यातच वापरतात. हिवाळ्यात तापमान कितीही असो, SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेले आणि ब्रॉड-स्पेक्ट्रम, पाणी-प्रतिरोधक आणि खनिज-आधारित सनस्क्रीन वापरणे आवश्यक असते. गडद हिवाळ्याच्या दिवसातही, युव्ही किरणोत्सर्गापासून त्वचेचे संरक्षण करण्यास अश्या प्रकारची सनस्क्रीन उपयोगी ठरते.

03. स्वतःला हायड्रेटेड ठेवा:

तुम्ही जे काही वापरता ते बाहेरून प्रतिबिंबित होते. म्हणून निरोगी खाणे आणि भरपूर पाणी पिण्याचे कायम लक्षात ठेवा. कोरडेपणा टाळण्यासाठी भरपूर द्रवपदार्थांचे सेवन करून शरीर हायड्रेटेड ठेवा. बाहेर थंडी असताना बरेच लोक पाणी पिणे टाळतात किंवा विसरतात. परिणामी शरीरातील पाणी झाल्यामुळे सुद्धा त्वचा कोरडी पडते. तेव्हा हिवाळ्यात आवर्जून दिवसाला कमीत कमी ४ ते ५ लिटर पाण्याचे सेवन करा.

04. फेस मास्क वापरा

हिवाळा हा ऋतू असतो जेव्हा तुमच्या त्वचेला अतिरिक्त मॉइश्चरायझेशनची गरज असते. मेकअप करण्यापूर्वी आणि त्वचा स्वच्छ केल्यानंतर लगेचच त्वचेला मॉइश्चरायझर लावा. त्याच बरोबर आपल्या त्वचेला हायड्रेट आणि पोषण देण्यासाठी फेस मास्क वापरा. फेसमास्कमध्ये असे घटक असतात जे केवळ मॉइश्चरायझ करत नाहीत तर कडाक्याच्या थंडीच्या ऋतूपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करतात. आठवड्यातून एकदा ५ ते १५ मिनिटांसाठी फेसमास्क लावणे सुरू करा आणि तुम्हाला फरक दिसेल.

05. फाउंडेशनचा वापर टाळा

हिवाळ्यात शक्यतो फाउंडेशन लावणे टाळावे. त्या ऐवजी तुम्ही बीबी किंवा सीसी क्रीम वापरू शकतात. फाउंडेशन वापरायचे असल्यास हायड्रेटिंग आणि SPF गुणधर्म असलेले फाउंडेशन निवडा. सर्वप्रथम, चेहऱ्यावर लिक्विड फाउंडेशनचा वापर करा. चेहऱ्यावर अतिरिक्त डाग लपवण्यासाठी फाउंडेशनचा जाड कोट करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या फाउंडेशनमध्ये थोडे बेबी ऑइल घालून देखील चेहऱ्याला लावू शकता.

06. पावडर उत्पादने टाळा

पावडर उत्पादने वापरल्याने तुमची त्वचा निस्तेज, कोरडी, फाटलेली आणि खराब दिसते. अशा स्थितीत, तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि तुमच्या त्वचेच्या टोनशी जुळते लिक्विड प्रोफाइल असलेली फाउंडेशन, हायलाइटर, क्रीम ब्लश, मूस ब्लश, क्रेयॉन किंवा जेल आय कलर आणि मॉइश्चरायझिंग लिपस्टिक सारख्या मेकअप उत्पादने निवडण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून ते तुमचा चेहरा मऊ, लवचिक आणि मॉइश्चरायझ दिसण्यास मदत होईल.

07. लाईट मेकअप करा

हिवाळ्यामध्ये प्रत्येक ऋतू सारखा जास्त मेकअप सहसा चांगला वाटत नाही. त्याऐवजी क्रीम बेस फाउंडेशनचा वापर करून गालाला हाताने ब्लशर किंवा ब्रॉन्ज लावल्याने तुमचा चेहरा निरोगी आणि चमकदार दिसतो. डोळ्यांना स्मोकी लुक देण्यासाठी काळ्या आणि तपकिरी आयशॅडो वापरा. हिवाळ्यात डार्क कलरच्या लिपस्टिकने चेहरा अधिक खुलून दिसतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com