जि.प.विद्यानिकेतनचे मैदान भाड्याने न देण्याबाबतचा प्रस्ताव!

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत 20 विषय पटलावर
जि.प.विद्यानिकेतनचे मैदान भाड्याने न देण्याबाबतचा प्रस्ताव!
jalgaon zp

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेची (Zilla Parishad) सर्वसाधारण सभा (General meeting) दि.3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता जि.प.अध्यक्षा ना. रंजना पाटील (ZP President Ranjana Patil) यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत जि.प.विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय (ZP Vidyaniketan and Junior College) जळगाव येथील पटांगण (Patangan) यापुढे व्यापारी तत्वावर भाड्याने (For rent) न देण्याबाबत ठराव (Resolution) करण्यात येणार आहे.

जिल्हा ग्राम विकास निधीतून कर्ज मंजुरी देणे यासह 20 विषय पटलावर ठेवण्यात आलेले आहेत. विद्यामान पदाधिकार्‍यांच्या कार्यकाळातील ही शेवटची सभा असल्याने विरोधकांकडून कोंडी करण्याच्या दृष्टीने व्यूहरचना करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शेवटची सभा वादळी ठरणार आहे.

शिक्षण व क्रीडा समितीच्या शिफारशीनुसार जि.प.प्राथमिक शाळा जीर्ण वर्गखोलीचे निर्लेखनास मान्यता देणे, यशवंत पंचायतराज अभियान अंतर्गत प्राप्त झालेले पारितोषिक रक्कम रु.17 लक्षचे विनियोजनास मान्यता मिळण्याबाबत,चोपडा पंचायत समिती सभापतींनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सदस्य पदाची जागा भरणे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प.जळगाव अंतर्गत मजदूर वर्ग 4 दखभाल व दुरुस्ती निधीतील कर्मचार्‍यांना कुटुंब निवृत्ती वेतनास मान्यता मिळण्याबाबत, आरोग्य विभागाकडील स्विपर कर्मचारी (वर्ग 4) यांना गणवेश भत्ता अदा करण्यासाठी आरोग्य विभागाकडील मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीत पुनर्विनियोजन करण्यास मंजुरी मिळण्याबाबत,जामनेर तालुक्यातील गोद्री येथील जिर्ण व पडकी स्मशानभूमी मिळकत क्र.824 निर्लेखनास परवानगी मिळ्याबाबत येत्या सभेत ठराव करण्यात येणार आहे.या सभेत 20 विषय पटलावर ठेवण्यात आलेले आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे ग्रामपंचायत कार्यालय जीर्ण झाल्यामुळे निर्लेखनास परवानगी मिळण्याबाबतचा विषय पटलावर ठेवण्यात आलेला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथील समाज मंदिर जीर्ण झाल्यामुळे निर्लेखनास परवानगी मिळण्याबाबत ठराव करण्यात येणार आहे.जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथे जुनी ग्रामपंचायत इमारत व जुने जनसेवा व्यापारी संकुलाच्या इमारती जीर्ण झाल्यामुळे निर्लेखनास परवानगी मिळण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com